शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:45 IST

दिव्यांग किंवा गंभीर आजार असल्याची खोटी माहिती देत बदली टाळणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल केला जाईल.

मुंबई: दिव्यांग किंवा गंभीर आजार असल्याची खोटी माहिती देत बदली टाळणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून, त्यांना निलंबित करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने काढले आहेत. जिल्ह्यांतर्गत बदली टाळण्यासाठी शिक्षकांकडून खोटी प्रमाणपत्रे सादर केली जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे बदली टाळण्यासाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्याचा संशय असलेल्यांची फेरतपासणी करण्याचे आदेशही ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदलीच्या धोरणानुसार ‘विशेष संवर्ग शिक्षक भाग-१’ मधील शिक्षकांना बदलीतून सूट दिली जाते. विविध आजारांनी ग्रस्त शिक्षक, दिव्यांग शिक्षक, दिव्यांग मुलांचे पालक, परित्यक्ता तसेच घटस्फोटित महिला शिक्षक, ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक, विधवा, कुमारिका शिक्षक, तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार गंभीर आजाराने ग्रस्त आहेत इत्यादींचा विशेष संवर्गात समावेश केला जातो.  मात्र, विविध आजारांची व दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्रे सादर करून बदलीमधून सूट मिळविणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण जास्त असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच, न्यायालयानेही विशेष संवर्गाद्वारे बदलीपासून संरक्षण का दिले, याचा खुलासा करण्याचे आदेश काही खटल्यात केले आहेत. या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले आहेत.

परिपत्रकात काय म्हटले? विशेष संवर्ग-१ मधील शिक्षकाच्या दिव्यांगत्वाबाबत किंवा आजाराबाबत काही साशंकता आढळल्यास, संबंधित शिक्षकाची जिल्हा शल्यचिकित्सकांकडून तपासणी करावी. दिव्यांग प्रमाणपत्र देताना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन झालेले असावे. घटस्फोटित किंवा परित्यक्ता महिला शिक्षकांबाबत काही अनियमितता आढळल्यास घटस्फोट प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत, स्वयंघोषणापत्र, रहिवास दाखले, आधार कार्ड, शिधापत्रिका इत्यादीवरून पडताळणी करावी. आवश्यकतेनुसार निवासी पत्त्यावर प्रत्यक्ष जाऊन शहानिशा करावी. स्वयंघोषणापत्रामध्ये काही अनियमितता केल्याचे आढळून आल्यास, अशा शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच संबंधित शिक्षकाचे निलंबन करून शिस्तभंगविषयक कार्यवाही करावी.

टॅग्स :Teacherशिक्षकMaharashtraमहाराष्ट्र