मुख्याध्यापिकेच्या छळाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या
By Admin | Updated: June 23, 2014 04:22 IST2014-06-23T04:22:03+5:302014-06-23T04:22:03+5:30
मुख्याध्यापिकेच्या छळाला कंटाळून नगरपालिकेच्या शाळा क्र. ३५ मधील शिक्षक महेंद्रसिंह प्रल्हाद सिंह सिसोदिया (४५) यांनी रविवारी शाळेत गळफास घेऊन आत्महत्या केली

मुख्याध्यापिकेच्या छळाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या
भुसावळ (जि. जळगाव) : मुख्याध्यापिकेच्या छळाला कंटाळून नगरपालिकेच्या शाळा क्र. ३५ मधील शिक्षक महेंद्रसिंह प्रल्हाद सिंह सिसोदिया (४५) यांनी रविवारी शाळेत गळफास घेऊन आत्महत्या केली.
मुख्याध्यापिकेच्या त्रासाबाबत त्यांनी सूसाईड नोट लिहून ठेवली. सिसोदिया रविवारी सकाळी १० च्या सुमारास शाळेत आले. त्यांच्याकडे मतदार नोंदणी अधिकारीपदाची जबाबदारी होती. दुपारी दीडनंतर त्यांनी मुलगा मोहितच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करुन तुम्ही जेवण आटोपून घ्या मला यायला उशीर होईल, असा निरोप दिला होता. (प्रतिनिधी)