शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

शिक्षकांच्या विशेष नैमित्तिक रजा रद्द

By admin | Updated: February 5, 2016 04:16 IST

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी शिक्षकांना शासनाने मंजूर केलेली ‘विशेष नैमित्तिक रजा’ उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केली

औरंगाबाद : नवी मुंबईत गुरुवारपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी शिक्षकांना शासनाने मंजूर केलेली ‘विशेष नैमित्तिक रजा’ उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केली. ‘किरकोळ रजा’ (सी.एल.) म्हणून ती गृहीत धरावी, असे न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. ए. आय. एस. चिमा यांनी आदेशात म्हटले आहे. प्राथमिक शिक्षण संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन येथून पुढे कायमस्वरुपी बंद करण्याचे आदेश देण्याची विनंती याचिकाकर्त्याने केली. खंडपीठाने याचिकेत दुरुस्ती करण्याची मुभा दिली. पुढील सुनावणी ११ फेब्रुवारीला होणार आहे. पैठण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर कपटी यांनी ही याचिका दाखल केली आहे.अधिवेशनास खासगी तसेच जिल्हा परिषदांच्या शाळांतील शिक्षक, शिक्षणसेवक गेले आहेत. त्यांना प्रवासाच्या दिवसासहित कमाल ६ दिवसांची (१ ते ६ फेब्रुवारी पर्यंतची) विशेष नैमित्तिक रजा शासनाने २९ जानेवारीच्या परिपत्रकाद्वारे मंजूर केलेली आहे. त्यानुसार शिक्षक या काळात अनुपस्थित असताना ते नोकरीवर हजर म्हणून गृहीत धरण्यात येत आहेत.महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती नियम १९६४नुसार फक्तआजारी असताना अथवा खेळाडूला क्रीडा स्पर्धांच्या काळातच विशेष नैमित्तिक रजा मिळूशकते. २००८ साली झालेल्या प्राथमिक शिक्षण संघाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने दाखल याचिकेच्या अनुषंगाने अधिवेशन काळातील रजा ही नोकरीवरहजर म्हणून (आॅन ड्यूटी) देतायेणार नाही. कारण तो शासनाचा धोरणात्मक निर्णय नाही, असे उच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २००८च्या आदेशात म्हटले होते. (प्रतिनिधी)