शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सोयीच्या बदल्यांसाठी शरद पवारांना साकडे; ग्रामविकास विभागाच्या निर्णयाकडे राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 12:10 IST

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ३१ जुलै पूर्वी करण्याचा आदेश राज्य शासनाने जिल्हा परिषदांना दिला आहे..

ठळक मुद्देआज शिक्षक संघाची ग्रामविकास मंत्र्यांसोबत कोल्हापूरमध्ये बैठक 

बारामती : कोरोनामुळे बदल्या होणार नाही असे वाटत असताना अचानक शासनाने ३१ जुलै पूर्वी राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी  सोयीच्या बदल्यांसाठी ज्येष्ठ  नेते शरद पवार यांना साकडे घातले आहे .पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत आज कोल्हापूर येथे बैठक होत आहे .ग्रामविकास विभागाच्या निर्णयाकडे राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.        शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी याबाबत माहिती दिली. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ३१ जुलै पूर्वी करण्याचा आदेश राज्य शासनाने जिल्हा परिषदांना दिला आहे,  २७ फेब्रुवारी १७ च्या जुन्या शासन निर्णयाप्रमाणे या बदल्या होत आहेत.जुन्या शासन निर्णयामुळे यावर्षी विस्थापित ,रँडम राऊंड , समानीकरण, आंतर जिल्हा बदलीने आलेले शिक्षक, पती पत्नी तसेच एकल यापैकी कोणत्याही शिक्षकांना विशेष लाभ मिळत नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे. प्राथमिक शिक्षक संघाच्या कोल्हापूर येथील महामंडळ सभेत शरद पवार यांच्या उपस्थितीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बदली धोरणात दुरुस्ती करून सोयीच्या बदल्या करण्याची घोषणा केली होती .त्यानंतर शासनाने संघटनांची भूमिका समजून घेण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीआयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची स्थापना केली होती.या अभ्यासगटाचा अहवाल प्रतीक्षेत असतानाच अचानक राज्य सरकारने ३१ जुलै पूर्वी बदल्या करण्यास सुचविले आहे.त्यामुळे शिक्षक नेते संभाजीराव थोरात, राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी शरद पवार यांच्याकडे सोयीच्या बदली धोरणासाठी आग्रह धरला आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीTeacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळाSharad Pawarशरद पवारHasan Mushrifहसन मुश्रीफState Governmentराज्य सरकारTransferबदली