शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

'परीक्षा काळात शिक्षकांना निवडणुकीचे काम नको'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 04:48 IST

शिक्षण मंडळाची शिक्षण विभागाला विनंती

मुंबई : राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेच्या कामकाजाची जबाबदारी असलेल्या शिक्षकांची लोकसभा निवडणुकीच्या कामातून सुटका करावी, अशी विनंती राज्य शिक्षण मंडळाने शिक्षण विभागाला केली आहे.राज्याच्या विविध विभागांत इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा २२ मार्चपर्यंत सुरू राहणार आहेत. या कामकाजात बहुसंख्य शिक्षक गुंतले आहेत. या परीक्षेच्या कामासाठी आधीच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने केंद्रसंचालक, उपकेंद्रसंचालक, पर्यवेक्षक, मुख्य नियामक, नियामक, परीक्षक म्हणून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, लिपिक, शिपाई यांच्या नेमणुका केल्या जातात. लेखी परीक्षा संपल्यानंतर पेपर तपासणीचे काम परीक्षक व नियामक यांच्याकडे सोपविण्यात येत असते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल ५ जूनपूर्वी जाहीर करणे आवश्यक आहे.कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेच्या माहितीनुसार, एप्रिल अखेर शिक्षकांना २ कोटींच्या आसपास उत्तरपत्रिका तपासून निकालाचे काम पूर्ण करून निकाल वेळेत द्यायचा आहे. यामुळे राज्य शिक्षण मंडळाने त्याची सकारात्मक दखल घेऊन शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र पाठविले होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मुंबई विभागाने निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदने पाठविली होती.यावर या परीक्षेच्या कामात व्यस्त असलेल्या शिक्षकांना निवडणुकीची ड्युटी देऊ नये व नियुक्ती दिली असल्यास ती रद्द करण्याबाबत योग्य ती कारवाई करावी, असे आदेश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी अ. ना. वळवी यांनी राज्यातील सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना दिले आहेत. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी सुमारे ८० हजार, तर बारावीच्या परीक्षेसाठी ५० हजार जणांवर परीक्षक व नियामक म्हणून जबाबदारी देण्यात आल्याचे समजते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकTeacherशिक्षक