आत्महत्येप्रकरणी शिक्षिकेला अटक

By Admin | Updated: February 26, 2015 06:00 IST2015-02-26T06:00:12+5:302015-02-26T06:00:12+5:30

खांदा कॉलनीमधील न्यू होरिझोन शाळेतील गौरव कंक (१२) या सहावीतील विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येप्रकरणी सौम्या मनोहरन (२५) या शिक्षिकेला

The teacher was arrested in the suicide case | आत्महत्येप्रकरणी शिक्षिकेला अटक

आत्महत्येप्रकरणी शिक्षिकेला अटक

पनवेल : खांदा कॉलनीमधील न्यू होरिझोन शाळेतील गौरव कंक (१२) या सहावीतील विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येप्रकरणी सौम्या मनोहरन (२५) या शिक्षिकेला खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
गौरवने शिक्षिकेवर वैयक्तिक टिपणी केल्यावर सौम्या यांनी त्याला फटकारले व शाळेच्या मुख्याध्यापिका आणि पालकांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या गौरवने चौथ्या मजल्यावरील बाल्कनीतून उडी मारली व त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मंगळवारी उशिरा सौम्या मनोहरनला अटक केली. बुधवारी पनवेल न्यायालयात हजर केले असता तिला २७ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली.

Web Title: The teacher was arrested in the suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.