विनयभंगप्रकरणी शिक्षकाला अटक
By Admin | Updated: March 1, 2017 05:46 IST2017-03-01T05:46:42+5:302017-03-01T05:46:42+5:30
कर्जत तालुक्यातील नेरळ येथील एलएईएस इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शिक्षकानेच विनयभंग केल्याचा प्रकार घडला

विनयभंगप्रकरणी शिक्षकाला अटक
नेरळ : कर्जत तालुक्यातील नेरळ येथील एलएईएस इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शिक्षकानेच विनयभंग केल्याचा प्रकार घडला. राजेश शेळके असे शिक्षकाचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी शिक्षकाला अटक केली.
नेरळच्या एलएईएस इंग्लिश मीडियम स्कूल येथे पी.टी.चा शिक्षक म्हणून राजेश शेळके कार्यरत आहे. दोन वर्षांपासून मुलीला शाळेमध्ये अडवून तिला शेळके दमदाटी करीत होता. २६ फेब्रुवारीला त्याने मुलीला धमकी देऊन जबरदस्तीने पनवेल येथे नेले, तसेच याबाबत कोणाला काहीही न सांगण्याबाबत धमकी दिली. मात्र विद्यार्थिनीने हा प्रकार पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली. त्यानंतर २७ फेब्रुवारीला पोलिसांनी शेळकेलाअटक केली असून पॉक्सो कलम ७, ८प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)