शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी पुरस्कार सोहळ्यावर शिक्षक संघटनांचा बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 00:05 IST

काही निवडक शिक्षकांना पुरस्कार द्यायचे, मात्र राज्यातील लाखो शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवायचे, असे दुटप्पी धोरण सरकार राबवित असल्यामुळे बुधवारी होणाऱ्या शिक्षक पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिक्षक संघटनांनी घेतला आहे.

यवतमाळ : काही निवडक शिक्षकांना पुरस्कार द्यायचे, मात्र राज्यातील लाखो शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवायचे, असे दुटप्पी धोरण सरकार राबवित असल्यामुळे बुधवारी होणाऱ्या शिक्षक पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिक्षक संघटनांनी घेतला आहे. ‘सन्मान नको, पण समस्या आवरा’ असे निषेधपत्र शासनाला सोपविले जाणार आहे.बुधवारी शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्य शासन १०८ शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करणार आहे. मात्र, या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय राज्यभरातील शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने घेतला आहे. यासंदर्भात राज्य समन्वयक मधुकर काठोळे म्हणाले, राज्यातील शिक्षकवर्ग विविध समस्यांनी ग्रस्त आहे. चर्चा, आंदोलनांच्या माध्यमातून हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. तरीही सरकार समस्यांची दखल घ्यायला तयार नाही. त्यामुळे शिक्षक पुरस्कारांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यंदा आर्थिक तरतूद नसल्याचे निमित्त पुढे करून शासनाने या पुरस्कारांची संख्याही कमी केली आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये रोष आहे. मात्र केवळ पुरस्कार देण्याची औपचारिकता पूर्ण करण्यापेक्षा शिक्षकांना समस्यामुक्त करण्याची मागणी समन्वय समितीने केली आहे. २३ आॅक्टोबरच्या शासन आदेशानुसार शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी मिळणे कठीण झाले आहे. २७ फेब्रुवारीच्या शासन आदेशाने बदल्या झाल्या मात्र या जीआरमधील त्रुटी वारंवार मागणी करूनही शासनाने दुरुस्त केल्या नाहीत. जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी आंदोलनानंतरही प्रलंबित ठेवण्यात आली आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षकांना वेतनवाढ देण्याचा शासन निर्णय असूनही वेतनवाढ बंद करण्यात आली आहे. आॅनलाइन कामे करण्यासाठी केंद्र स्तरावर डाटा आॅपरेटरच्या नियुक्त्या दुर्लक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोजक्या शिक्षकांचा सन्मान करण्यापेक्षा सर्व शिक्षकांना समस्यामुक्त करावे, अशी मागणी करत समितीने पुरस्कारांवर बहिष्कार जाहीर केला आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक