शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक दिनी रस्त्यावर उतरून शिक्षकांचे आंदोलन; कोल्हापुरात विनाअनुदानित शिक्षकांची ‘महाआरती’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 03:28 IST

‘जयदेव जयदेव जय भाजपा सरकार, शंभर टक्के हक्काचा द्या आम्हा पगार...’ या महाआरतीद्वारे विनाअनुदानित शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांनी बुधवारी विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येथे आंदोलन केले.

मुंबई : ‘जयदेव जयदेव जय भाजपा सरकार, शंभर टक्के हक्काचा द्या आम्हा पगार...’ या महाआरतीद्वारे विनाअनुदानित शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांनी बुधवारी विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येथे आंदोलन केले. राज्यात अनेक ठिकाणी शिक्षक दिनी शाळा बंद ठेवून शिक्षक रस्त्यांवर उतरल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले.महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले. येथील कोल्हापूर विभागीय शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर दुपारी साडेबारा वाजता मुख्याध्यापक, शिक्षक जमले. त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात ‘अनुदान आमच्या हक्काचे’, ‘शंभर टक्के हक्काचा पगार मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर माजी राष्ट्रपती व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेसमोर मराठवाड्यातील शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते ‘शासनाची महाआरती’ करून सर्व आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला.सांगली, सातारा सोलापूरसह कोकणातही अनेक ठिकाणी आपल्या व्यथा मांडण्यासाठी शिक्षक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.... अन्यथा गांधीजयंतीपासून तीव्र आंदोलन : विक्रम काळेआमदार विक्रम काळे म्हणाले, प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याबाबत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांनी वेळोवेळी आश्वासने दिली; पण, त्यांची पूर्तता त्यांनी केली नाही. मागण्यांच्या पूर्ततेसाठी आम्ही १४०हून अधिक आंदोलने केली आहेत. आता सरकारने आमचा अंत पाहू नये. अन्यथा दि. २ आॅक्टोबरला महात्मा गांधीजयंतीपासून राज्यात तीव्र आंदोलन केले जाईल.नाशिकसह खान्देशातील जिल्ह्यांमध्येही शिक्षकांनी आंदोलन केले. पुण्यातही शिक्षकांनी आंदोलन केले. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात आले.मराठवाड्यात भीक मांगो आंदोलनऔरंगाबाद : मराठवाड्यात अनेक ठिकाणी शिक्षकांनी भीक मांगो आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. औरंगाबाद येथे मराठवाडा कृती समितीने विभागीय आयुक्तालयासमोर दिवसभर धरणे दिले. बदली धोरणामुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांना तत्काळ स्थापित करण्याची मागणी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. लातूर, नांदेड, हिंगोली, जालना, परभणी, येथे आंदोलन झाले.

टॅग्स :Teacherशिक्षकTeachers Dayशिक्षक दिन