शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना पगार अन् नोकरीचीही नाही शाश्वती! शिक्षक दिनी ज्ञानदातेच रस्त्यावर, आज शाळा ठेवणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 05:53 IST

पगार व नोकरीची खात्री नसल्याने बुधवार, शिक्षक दिनी विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, कर्मचारी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत.

मुंबई : पगार व नोकरीची खात्री नसल्याने बुधवार, शिक्षक दिनी विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, कर्मचारी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. कृती समितीतर्फे ६,५०० विनाअनुदानित शाळा बंद ठेवून, ४५ हजार शिक्षक ‘शासनाची महाआरती’ करून निषेध नोंदविणार आहेत.२००५नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू न करण्याच्या निषेधात जुनी पेन्शन हक्क समितीचे शिक्षक काळ्या फिती लावून काम करतील. मराठवाडा, विदर्भात वर्षानुवर्षे विनावेतन काम करणारे शिक्षक भीक मांगो आंदोलन करतील. अकोला, वाशिम व बुलडाण्यात ते काळ्या फिती लावून काम करतील. याआधीही या शिक्षकांनी व्यथा मांडली़ मात्र सरकारने दखल घेतली नाही़ वेळेवर वेतन मिळत नसल्याने आश्रम शाळेतील शिक्षक व कर्मचारी निषेध करतील.स्वखर्चातून उभारली प्रयोगशाळाअनेक प्रश्न असूनही हे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना मात्र विसरत नाहीत. त्याची दोन उदाहरणे समोर आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या सरस्वती विद्यानिकेतनच्या अध्यापिका दामिनी भिंगार्डे यांनी स्वखर्चाने फिरती प्रयोगशाळा तयार केली. जिल्ह्यातील शाळांमध्ये त्या २५ प्रयोग सादर करतात. दरवर्षी एक हजार विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य प्रयोग सादर करीत आहेत.शाळा बनविली डिजिटल!अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदेच्या परवाज उर्दू प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी स्वत:च नऊ लाख रुपये गोळा करून शाळा डिजिटल बनविली आहे. मुख्याध्यापक अफजल हुसेन व शिक्षकांनी विद्यादानासाठी स्वत:ला वाहून घेतले. शिक्षकांनी १२ वर्गखोल्या डिजिटल केल्या.काळा दिवस पाळणारभीक मागून जमा झालेली रक्कम सरकारला पाठविणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेशाध्यक्षप्रा. मनोज पाटील यांनी दिली.शाळांवर दृष्टिक्षेपमाध्यमिक, प्राथमिकविनाअनुदानित शाळा : ६५००शिक्षक : ४५ हजारविद्यार्थ्यांची संख्या : सुमारे १० लाख

टॅग्स :Teacherशिक्षकMaharashtraमहाराष्ट्र