विद्यार्थी पटसंख्येनुसार शिक्षक नेमावे

By Admin | Updated: July 2, 2016 03:36 IST2016-07-02T03:36:32+5:302016-07-02T03:36:32+5:30

विक्रमगड तालुक्यात २३७ जिल्हा परिषदेच्या शाळा असून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी या जिल्हा परिषदेच्या शाळेवर पटसंस्थेनुसार शिक्षक नेमण्याची गरज आहे.

Teacher appoint according to student population | विद्यार्थी पटसंख्येनुसार शिक्षक नेमावे

विद्यार्थी पटसंख्येनुसार शिक्षक नेमावे


विक्रमगड/ तलवाडा : विक्रमगड तालुक्यात २३७ जिल्हा परिषदेच्या शाळा असून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी या जिल्हा परिषदेच्या शाळेवर पटसंस्थेनुसार शिक्षक नेमण्याची गरज आहे.
तालुक्यात शिक्षक, पदवीधर शिक्षक, केंद्र प्रमुख यांची संख्या कमी असून काही शाळेवर शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त बोझा आहे. विद्यार्थ्यींच्या संख्येनुसार शिक्षकाची संख्या असणे गरजेचे आहे परंतु शिक्षकाची संख्या कमी असल्याने हा फरक दिसत आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळा असून या शाळेत विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण मिळावे यासाठी शासन लाखो रूपये खर्च करीत असताना शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी अजून अभ्यासाला सुरवातही झालेली नाही. (वार्ताहर)
>प्रक्रिया सुरु, शिक्षक दिले जातील
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये ८ वीचे वर्ग सुरू झालेली आहेत परंतु अशा ठिकाणी शिक्षकाची संख्या पूर्ण असणे गरजेचे आहे. याबाबत गटशिक्षण अधिकारी एस. मोकाशी यांनी विचारणा केली असता याबाबत प्रक्रीया चालू असून सर्वच शाळांना पटसंख्येनुसार शिक्षक दिला जाईल असे आश्वासन दिले.

Web Title: Teacher appoint according to student population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.