शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

मुलांना मुलींचा आदर करण्यास आणि योग्य काय- अयोग्य काय शिकवा! ‘बेटा पढाओ, बेटी बचाओ’चा उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 08:09 IST

Mumbai High Court News: ‘पोक्सो’अंतर्गत येणाऱ्या प्रकरणातील मुलींची चाचणी महिला डॉक्टरनेच करावी आणि ही चाचणी करण्यास खासगी रुग्णालये नकार देऊ शकत नाहीत आणि ते पीडितेला पोलिसांकडे जाण्यास सांगू शकत नाहीत, असेही खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले.

 मुंबई - मुलांना योग्य-अयोग्य काय, हे शिकवण्याबरोबरच महिला आणि मुलींचा आदर करण्याचे शिकवणेही गरजेचे आहे, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने ‘बेटा पढाओ, बेटी बचाओ,’ याचा पुनरुच्चार केला. बदलापूरच्या शाळेतील लैंगिक अत्याचाराबाबत स्वयंप्रेरणेने दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवर मंगळवारी सुनावणी घेताना न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली.

‘पोक्सो’अंतर्गत येणाऱ्या प्रकरणातील मुलींची चाचणी महिला डॉक्टरनेच करावी आणि ही चाचणी करण्यास खासगी रुग्णालये नकार देऊ शकत नाहीत आणि ते पीडितेला पोलिसांकडे जाण्यास सांगू शकत नाहीत, असेही खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले. राज्य सरकारने अशा घटना रोखण्यासाठी आखलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळीन्यायालयाला सादर केली.

यावेळी खंडपीठाने ‘पोक्सो’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व शैक्षणिक संस्थांमध्ये मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी काय उपाययोजना आखाव्या लागतील, त्याबाबत सर्वसमावेशक शिफारशी देण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीवर उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्या. साधना जाधव व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. तसेच समिती सदस्य म्हणून त्यावर माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांचीही नियुक्ती केली. न्यायालयाने सरकारला बाल कल्याण समितीमधील एका सदस्याचाही या समितीमध्ये समावेश करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या समितीला आठ आठवड्यांत शिफारशी सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने यावेळी दिले.

बदलापूर गुन्ह्याच्या तपासाबाबत असमाधानघटनेनंतर संबंधित शैक्षणिक संस्थेचे दोन विश्वस्त फरार झाले. त्यांच्या अटकेसाठी एसआयटीने केलेल्या प्रयत्नांवर न्यायालयाने असमाधान व्यक्त केले. पोलिसांनी केस डायरीत तपासाबाबत नीट नोंद न केल्यानेही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. गेली ३५ वर्षे अशाच पद्धतीने केस डायरी लिहिली जात आहे. या पद्धतीत सुधारणा होण्याची आवश्यकता आहे, असे न्यायालयाने म्हटले.

आरोपपत्र दाखल करण्याची घाई नको    राज्य सरकारने याप्रकरणात काय पावले उचलली आणि काय तपास सुरू आहे, याची माहिती दिल्यानंतर न्यायालयाने यापुढे काय? असा प्रश्न केला.    तेव्हा महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी आता आरोपपत्र दाखल करू, अशी माहिती दिली. तेव्हा खंडपीठाने ‘लोकांच्या दबावाला बळी पडून आरोपपत्र दाखल करण्याची घाई करू नका. तपास योग्य रीतीने झाला आहे का? याची खात्री करूनच पुढे जा,’ असे सांगितले.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट