टीडीआर घोटाळ्याची चौकशी थंडावली

By Admin | Updated: April 7, 2015 04:25 IST2015-04-07T04:25:44+5:302015-04-07T04:25:44+5:30

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या हद्दीत रस्ते व बगीचे विकसीत करून देण्याच्या बदल्यात ५५ प्रकरणांत देण्यात आलेल्या विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) घोटाळ्याची चौकशी करून

TDR probe scandal | टीडीआर घोटाळ्याची चौकशी थंडावली

टीडीआर घोटाळ्याची चौकशी थंडावली

मुंबई : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या हद्दीत रस्ते व बगीचे विकसीत करून देण्याच्या बदल्यात ५५ प्रकरणांत देण्यात आलेल्या विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) घोटाळ्याची चौकशी करून सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण सोपवण्याची तयारी मागील सरकारने दाखवली होती. मात्र राज्यातील सत्ताधारी पक्ष हेच बदलापूरमधील सत्ताधारी असल्याने आणि आतापर्यंत हे प्रकरण लावून धरणारे आमदार किसन कथोरे हे भाजपात दाखल झाल्याने बदलापूरच्या टीडीआर घोटाळ््याची चौकशी थंड्या बस्त्यात टाकण्यात आली आहे.
बदलापूर नगरपालिकेतील अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी संगनमत करून २०११ ते २०१३ या कालावधीत रस्ते व बगीचे विकसीत करून देण्याच्या बदल्यात स्वत:च्या मर्जीतील कंत्राटदारांना टीडीआर प्रमाणपत्र दिली. ही कामे देताना निविदा प्रक्रिया अमलात आणली नाही तसेच जुन्या रस्त्यांच्या उभारणीकरिताही टीडीआर दिले गेले. बगीचाचे टीडीआर देताना जमीन मालकाने स्वत:च भूखंडाला कुंपण घातले व चार खेळणी बसवून त्या जागेवर बगीचाचा टीडीआर घेतला, अशी तक्रार तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे यांनी केली होती. याबाबत त्यांनी दाखल केलेल्या लक्षवेधी सूचनेवर चर्चेअंती चौकशीचे आदेश तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी दिले होते.
चौकशीत बदलापूर नगरपालिकेने निविदा न मागवता टीडीआर देण्याची प्रक्रिया पार पाडली, त्याचबरोबर नगरपरिषदेने शासनाकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे होते आणि या संपूर्ण प्रकरणात नियमबाह्य कामे झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे किसन कथोरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ७ आॅगस्ट २०१४ रोजी पत्र लिहून सर्व दोषी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे यांच्यामार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. विधानसभेचे
वारे सुरु होताच कथोरे यांनी
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात उडी घेतली. आता ते भाजपाचे आमदार आहेत.

Web Title: TDR probe scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.