टीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष भाजपा सहकार आघाडीच्या सात जिल्ह्यांचे ‘विभागीय संयोजक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 19:47 IST2018-06-09T19:47:00+5:302018-06-09T19:47:00+5:30

TDPCC vice-president, BJP's co-ordinator of seven districts, | टीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष भाजपा सहकार आघाडीच्या सात जिल्ह्यांचे ‘विभागीय संयोजक’

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके (टीडीसीसी) उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे 

ठळक मुद्देटीडीसीसी बँकेचे मागील काही वर्षांपासून एकमेव भाजपाचे संचालकमहाराष्ट्र राज्य सहकारी संघच्या संचालकपदी नुकतीच निवडभाजपाने आता त्यांच्यावर या सात जिल्ह्यांच्या विभागीय संयोजक पदाची जबाबदारी

ठाणे: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके (टीडीसीसी) उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे  यांच्यावर भाजपाच्या महाराष्ट्र  प्रदेश सहकारी आघाडीच्या ‘विभागीय संयोजक’ पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यास अनुसरून या आघाडीचे प्रभारी अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर व संयोजक संजय भेंडे यांनी तसे लेखी पत्र देऊन ठाणेसह जिल्ह्यासह पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर आदी सात जिल्ह्यांची जबाबदारी कुऱ्हाडे  यांना बहाल केली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघच्या संचालकपदी नुकतीच निवड झालेले कुऱ्हाडे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांपैकी सर्वात श्रीमंत असलेल्या या टीडीसीसी बँकेचे मागील काही वर्षांपासून एकमेव भाजपाचे संचालक आहेत. दीर्घकाळापासून या बँकेत भाजपाची बाजू मांडणारे कुऱ्हाडे यंदा उपाध्यक्ष पदी असताना भाजपाने आता त्यांच्यावर या सात जिल्ह्यांच्या विभागीय संयोजक पदाची जबाबदारी मिळाली आहे. सहकारी क्षेत्रातील त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन कुऱ्हाडे यांना विभागीय संयोजकाची जबाबदारी मिळाली. सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या या विभागीय संयोजक पदाचा मान ठाणे जिल्ह्यास मिळाल्यामुळे भाजपाच्या सहकार क्षेत्रात चैतन्याचे वातावरण आहे.

Web Title: TDPCC vice-president, BJP's co-ordinator of seven districts,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे