शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

५७३ कोटींच्या पीक कर्ज वाटपासाठी टीडीसीसी बँकेचे शेतकरी मेळावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:39 IST

खरीप हंगामाकरिता ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५७३ कोटी २८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपास मंजुरी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: खरीप हंगामाकरिता ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५७३ कोटी २८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपास मंजुरी दिली आहे. त्यासाठी ठिकठिकाणी शेतकरी मेळावे आयाेजित केले जात आहेत. बँकेच्या सर्व शाखांसह प्राथमिक कृषी सहकारी संस्था स्तरावर आयोजित शेतकरी मेळाव्यांना चांगला प्रतिसाद लाभत आहे.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही सहकार क्षेत्रातील महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना शेती कर्ज वाटप मुख्यतः बँकेमार्फत करण्यात येते. एसएलबीसीच्या सन २०२५-२६ च्या जिल्हा वार्षिक पत आराखड्यानुसार एकूण खरीप व रब्बी पीक कर्ज वाटपाचे ठाणे जिल्ह्यासाठी ४०४ कोटी ६८ लाख रुपये व पालघर जिल्ह्यासाठी २१६ काेटी २५ लाख रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यापैकी टीडीसीसी बँकेस ठाणे जिल्ह्यासाठी ४६ टक्के म्हणजेच १८७ कोटी २८ लाख तर पालघर जिल्ह्यासाठी ४५ टक्के म्हणजे ९८ कोटी ६४ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. 

खरीप हंगाम २०२५-२६ साठी...यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना ५७३ कोटी २८ लाख रुपयांचे पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकेने दोन्ही जिल्ह्यांत शेतकरी मेळावे आयोजित केले, असे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले. यासाठी बँकेने खरीप हंगामासाठी ठाणे जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी  २९१ कोटी ३३ लाख रुपये व पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २८१ कोटी ९५ लाख अशी एकूण  ५७३ काेटी २८ लाख रुपये पीक कर्ज वाटपासाठी मंजुरी दिल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. या मंजूर पीक कर्जापैकी १८ जूनपर्यंत ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७९ कोटी ७१ लाख व पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना  ७० कोटी ७७ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे, असेही पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपास अनुसरून ठाणे, पालघर जिल्ह्यातील सहकार विभागाचे अधिकारी, बँकेचे अधिकारी, शाखा तपासणीस, सहाय्यक तपासणीस यांची अलीकडेच सभा घेऊन खरीप हंगाम ‘२०२५-२६ खरीप पीक कर्ज’ वाटप नियोजन व आढावा घेण्यात आला. बँकेच्या सर्व शाखा, प्राथमिक कृषि सहकारी संस्था पातळीवर शेतकऱ्यांच्या सभा आयोजित करून त्यांना जास्तीत जास्त पीक कर्ज वाटप करून शासनाचे दिलेले उद्दिष्ट मुदतीत पूर्ण करण्यासाठी निश्चित केले, असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत पठारे यांनी सांगितले.

टॅग्स :Agriculture Schemeकृषी योजनाMaharashtraमहाराष्ट्र