सोलापूर : दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना येथील जैन गुरुकुल प्रशालेच्या परीक्षा केंद्रावर बुधवारी सकाळी घडली.घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुप्रिया संगपाल गाडे हिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़ बुधवारी इतिहासचा पेपर होता. जैन गुरुकुल केंद्रावर सकाळी १०.३०च्या सुमारास सर्व परीक्षार्थींना सोडण्यात आले. पेपर सुरू झाल्यावर अर्ध्या तासाने तिसऱ्या मजल्यावरून सुप्रियाने उडी मारली. तिच्या डोक्याला दुखापत झाली. शिक्षकांनी तातडीने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले़ प्राथमिक उपचारानंतर तिला शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. (प्रतिनिधी)
दहावीच्या विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: March 23, 2017 02:49 IST