दुचाकी भाडयावर देण्याविरोधात महाबळेश्वरात टॅक्सी चालकांचा बंद

By Admin | Updated: February 15, 2016 13:08 IST2016-02-15T13:08:16+5:302016-02-15T13:08:16+5:30

गोव्याप्रमाणे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांसाठी दुचाकी भाडयावर देण्याचा प्रोजेक्ट महाबळेश्वर येथे एक उद्योजक लवकरच सुरु करणार आहे.

Taxi drivers' bandh in Mahabaleshwar against bribery charges | दुचाकी भाडयावर देण्याविरोधात महाबळेश्वरात टॅक्सी चालकांचा बंद

दुचाकी भाडयावर देण्याविरोधात महाबळेश्वरात टॅक्सी चालकांचा बंद

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
महाबळेश्वर, दि. १५ - गोव्याप्रमाणे महाबळेश्वरमध्ये  पर्यटकांसाठी दुचाकी भाडयावर देण्याचा प्रोजेक्ट महाबळेश्वर येथे एक उद्योजक लवकरच सुरु करणार आहे. 
मात्र या प्रकल्पामुळे महाबळेश्वर आणि पाचगणीतील २१०० टॅक्सीचालकांच्या पोटावर पाय पडणार असल्याचा आरोप करत महाबळेश्वर टॅक्सी - टुरिस्ट टॅक्सी असोसिएशनने सोमवारी सकाळपासून बेमुदत बंद पुकारला आहे. 
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या या बंदला महाबळेश्वर व्यापारी संघटनेनेही १०० टक्के पाठिंबा दिला असून पोलिसांचा प्रचंड ताफा तैनात करण्यात आला आहे.

Web Title: Taxi drivers' bandh in Mahabaleshwar against bribery charges