५०० आणि १ हजारच्या नोटा देऊन भरा शासकीय कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2016 14:33 IST2016-11-10T14:33:11+5:302016-11-10T14:33:11+5:30
५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा रद्द केल्यानंतर आपल्याजवळच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरीकांनी बँकांमध्ये एकच गर्दी केली आहे

५०० आणि १ हजारच्या नोटा देऊन भरा शासकीय कर
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा रद्द केल्यानंतर आपल्याजवळच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरीकांनी बँकांमध्ये एकच गर्दी केली आहे. काही ठिकाणी नोटा बदलून मिळत आहे तर काही ठिकाणी नोटांचा तुटवडा असल्याने नागरीकांची गैरसोय होत आहेत.
यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचे सर्व कर आणि बिलाच्या रक्कमेवर ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील असे जाहीर केले आहे. ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत नागरीक ही रक्कम भरु शकतात. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेऊन एक प्रकारे नागरीकांना दिलासा दिला आहे.