ग्रामपंचायतींना भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली लवकरच
By Admin | Updated: December 23, 2015 23:29 IST2015-12-23T23:29:10+5:302015-12-23T23:29:10+5:30
ग्रामपंचायतीचा आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली लवकर लागू केली जाईल, असे जलसंपदा व जलसंधारण, संसदीय कार्य राज्यमंत्री

ग्रामपंचायतींना भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली लवकरच
नागपूर : ग्रामपंचायतीचा आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली लवकर लागू केली जाईल, असे जलसंपदा व जलसंधारण, संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विधानसभेत सांगितले.
सत्यजित पाटील यांनी लक्षवेधी सूचनेदरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवतारे बोलत होते.
भांडवली मूल्याच्या आधारे कर आकारणी करून त्यानुसार कर वसुली करण्याबाबत हरकती व सूचनांबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यामध्ये ७ डिसेंबर २०१५ पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या. या अधिसूचनेबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली आकारण्याबाबतची अंतिम अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती शिवतारे यांनी दिली. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य गोपाल अग्रवाल, शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)