तारापूरचा धूपप्रतिबंधक बंधारा मार्गी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 03:08 IST2016-07-31T03:08:20+5:302016-07-31T03:08:20+5:30
किनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारा लवकरच मार्गी लागणार असून या बंधाऱ्याकरिता दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे जि.प. च्या सदस्या शुभांगी कुटे यांनी सांगितले.

तारापूरचा धूपप्रतिबंधक बंधारा मार्गी लागणार
बोईसर : खळखळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि भरतीच्या पाण्यामुळे तारापूर समुद्रकिनाऱ्यावरील घरांना सततच्या धोक्यापासून वाचवण्याकरिता त्या किनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारा लवकरच मार्गी लागणार असून या बंधाऱ्याकरिता दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे जि.प. च्या सदस्या शुभांगी कुटे यांनी सांगितले.
या बंधाऱ्यासाठी मागील अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्याकरिता पाठपुरावा करतांना पालघर जिल्हा परिषदेमध्ये माझ्या पहिल्याच बैठकीत ठराव घेण्यात येऊन सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता, अशी माहिती त्यांनी दिली.२०० मीटर लांब व सात फूट उंच असलेल्या या बंधाऱ्याचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला असून त्याची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या नियोजित बंधाऱ्याच्या कामाची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नीरज चौरे व शाखा अभियंता बक्रू यांनी केली. त्या वेळी जि.प. सदस्या शुभांगी कुटे, राजू कुटे, अशोक दवणे, गजानन विंदे, विनायक तामोरे, अशोक पागधरे, विशाल नाईक, सुधीर दवणे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
>पहाणी करतांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नीरज चौरे व शाखा अभियंता बाखरू जि.प. सदस्या शुभांगी कुटे, राजू कुटे, अशोक दवणे, गजानन विंदे, विनायक तामोरे, अशोक पागधरे, विशाल नाईक, सुधीर दवणे आदी.
>तारापूर येथील धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यापूर्वी पर्यावरण खात्याची परवानगी घेण्यात येणार आहे. त्यानंतर, निविदा प्रक्रिया काढण्यात येऊन २०० मीटर लांब, सात फूट उंच असा साधारणत: १० फूट रुंद बंधारा बांधण्यात येईल. - एस.टी. बाखरू, शाखा अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर