टॅँकरची कारला धडक; पाच ठार
By Admin | Updated: May 30, 2016 02:17 IST2016-05-30T02:17:16+5:302016-05-30T02:17:16+5:30
बाळापूर-तरोडा रोडवरील घटना; मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश

टॅँकरची कारला धडक; पाच ठार
बाळापूर (अकोला ): टँकरने कारला चिरडल्याने चिमुकलीसह पाच जण ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बाळापूर ते तरोडा फाट्यादरम्यान रविवारी दुपारी घडली. अपघातात गुजरातमधील तिघांचा, तर मध्यप्रदेशातील दोघींचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे.
एमएच-४६-एफ-0५४२ या क्रमांकाचा टँकर बाळापूर येथून खामगावकडे जात होता. टँकरने विरुद्ध दिशेने येत असलेल्या डीडी-0३-इ-२९0६ या क्रमांकाच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील पाच जण ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच बाळापूर पोलीस व वाहतूक कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविले.