नागपूरमध्ये टँकरच्या स्फोटात पेट्रोलपंप जळून खाक
By Admin | Updated: May 9, 2015 16:12 IST2015-05-09T16:12:26+5:302015-05-09T16:12:38+5:30
नागपूरमध्ये पेट्रोल पंपवरील टँकरला आग लागून झालेल्या स्फोटात संपूर्ण पेट्रोल पंप जळून खाक झाला.

नागपूरमध्ये टँकरच्या स्फोटात पेट्रोलपंप जळून खाक
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ९ - नागपूरमधील वाडी परिसरातील पेट्रोल पंपवरील टँकरला आग लागून झालेल्या स्फोटात संपूर्ण पेट्रोल पंप जळून खाक झाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वर असलेल्या या पेट्रोल पंपवर टँकरमधून पेट्रोल रिकामं करताना हा स्फोट झाला. आज दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी संपूर्ण पेट्रोल पंपच जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच या भीषण आगीच्या झळा दूरपर्यंत लागत असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतूक ठप्प झाली.