शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Tamhini Ghat Accident: सनरुफने जीव घेतला...! ताम्हिणी घाटात दगड काच फोडून आत घुसला; पुण्याच्या महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 14:43 IST

Raigad Tamhini Ghat Accident: घाटमार्गावर जोरदार पाऊस सुरू असताना अचानक डोंगरावरून छोटे मोठे दगड खाली पडत होते. काही दगड गुजराती यांच्या कारच्या टपावर आदळले.

प्रसिद्ध ताम्हिणी घाट परिसरात सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाने छोटे-मोठे दगड रस्त्यावर कोसळत आहेत. यातीलच एक दगड पुण्याहून माणगावला निघालेल्या कारचा सनरूफ तोडून आतमध्ये घुसला आणि महिलेच्या डोक्याला मार लागला व तिचा मृत्यू झाला आहे. 

मृत महिलेचे नाव स्नेहल गुजराती (Snehal Gujarati). त्या ४२ वर्षांच्या होत्या. आज सकाळी पुणे-रायगड जोडणाऱ्या ताम्हिणी घाटातून त्या प्रवास करत होत्या. घाटमार्गावर जोरदार पाऊस सुरू असताना अचानक डोंगरावरून छोटे मोठे दगड खाली पडत होते. काही दगड गुजराती यांच्या कारच्या टपावर आदळले. यातील एक दगड कारच्या सनरुफची काच फोडून थेट आतमध्ये घुसला. दगड डोक्यात लागल्याने स्नेहल यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा मुलगा आणि पती किरकोळ जखमी झाले आहेत.

स्नेहल यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले, परंतू त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. पावसामुळे या भागात भूस्खलनाच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांनी अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय घाटातून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने या घटनेनंतर तात्काळ सुरक्षा उपाययोजना आणि रस्त्यांची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.

सनरुफ हा धोक्याचाच...कारचा सनरूफ हा धोक्याचाच आहे. परंतू, भारतात कार विक्रीसाठी ते एक आकर्षक फीचर ठरत आहे. केकवर जसे टॉपिंग्स असतात तसेच हे सनरुफ ठरत आहे. लहान मुलांना कारबाहेर डोकावण्यासाठी मुख्यत्वे हे सनरुफ वापरले जाते. परंतू, त्याचा वापर हा बाहेर डोकावण्यासाठी नाही तर परदेशात थंडी खूप जास्त असल्याने सूर्यकिरणे अंगावर घेण्यासाठी केला जातो. परंतू, भारतात याचा साईडइफेक्ट अपघाताच्यावेळी काच फुटून बाहेर पडणे किंवा सनरुफबाहेर डोकावताना कशावर तरी आदळणे अशा प्रकारे जीवघेणा ठरत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sunroof Turns Deadly: Woman Killed by Rockfall in Tamhini Ghat

Web Summary : A woman died in Tamhini Ghat after a rock crashed through her car's sunroof during heavy rain. The rock struck her head, resulting in instant death, while her son and husband sustained minor injuries. Authorities urge caution due to frequent landslides.
टॅग्स :Accidentअपघातcarकार