शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जरा कमी बोला! विधानसभा अध्यक्षांना आता शेवटची संधी; सर्वोच्च न्यायालयाने दिला ३० ऑक्टोबरचा ‘अल्टिमेटम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 06:30 IST

अध्यक्ष नार्वेकर न्यायालयाच्या आदेशांचे गांभीर्याने पालन करीत नाहीत. ११ मेनंतर त्यांनी काहीही केलेले नाही. त्यांना निर्णय घ्यावे लागतील, असे चंद्रचूड म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रताप्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नवे वास्तववादी वेळापत्रक सादर करण्यासाठी ३० ऑक्टोबरचे अल्टिमेटम दिले. दिलेल्या मुदतीत वेळापत्रक सादर न केल्यास न्यायालयाला वेळापत्रक जाहीर करावे लागेल, असे संकेत न्यायालयाने मंगळवारी सुनावणीदरम्यान दिले.

सुनील प्रभू (ठाकरे गट) विरुद्ध विधानसभा अध्यक्ष आणि जयंत पाटील (शरद पवार गट) विरुद्ध विधानसभा अध्यक्ष या प्रकरणांची एकत्र सुनावणी करताना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शेवटची संधी दिली. 

एकत्र करण्यात आलेल्या या दोन प्रकरणांमध्ये शिवसेनेच्या १६, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी करणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. 

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले...अध्यक्ष नार्वेकर न्यायालयाच्या आदेशांचे गांभीर्याने पालन करीत नाहीत. ११ मेनंतर त्यांनी काहीही केलेले नाही. त्यांना निर्णय घ्यावे लागतील. नार्वेकर यांना आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या निर्णय प्रक्रियेत विश्वास निर्माण करता आलेला नाही. सुनावणी किती दिवसांत संपविणार याचे वेळापत्रक सादर केले नाही तर आम्ही आदेश देऊ, असे म्हटले होते. त्यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. सॉलिसीटर जनरल संदेश नीट पोहोचवू शकले नाहीत. 

जरा कमी बोला...कोर्टाने काढले चिमटेnआता न्यायालयाला लागलेल्या दसऱ्याच्या सुटीदरम्यान सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी विधानसभा अध्यक्षांशी चर्चा करावी आणि नवे वेळापत्रक सादर करावे. nसुप्रीम कोर्टही वृत्तवाहिन्या बघत असते. सरकारची उपशाखा असल्यासारख्या मुलाखती देत आहेत. अध्यक्षांनी माध्यमांशी कमी बोलावे, असा चिमटाही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी काढला. nअशा मुलाखतींची आपल्याला माहिती नाही. न्यायालयाला दैनंदिन कामकाजाची माहिती हवी हे आपल्याला ठाऊक नव्हते. nसुधारित वेळापत्रक आजच सादर करता येणार नाही. ते २८ ऑक्टोबरनंतर देता येईल, असे तुषार मेहता म्हणाले. 

तर अशा याचिका निरर्थक : सिब्बलnसादर केलेल्या कागदपत्रांवर कोणताही आक्षेप नसताना अध्यक्ष वेळकाढूपणा करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या आमदारांनी दहाव्या अनुसूचीचे उल्लंघन केले आहे. nशिवसेना, राष्ट्रवादी आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार नाहीत व त्या प्रलंबित ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. nनिवडणुकांची वेळ आल्यानंतरही निकाल लागला नाही तर अशा याचिका निरर्थक ठरतात, असा युक्तिवाद ठाकरे आणि शरद पवार गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी केला.

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSupreme Courtसर्वोच्च न्यायालयRahul Narvekarराहुल नार्वेकरEknath Shindeएकनाथ शिंदे