शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीतून चार तास चर्चा अन् सकाळी सुटले उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 09:15 IST

Maratha Reservation: जीआर काढला, त्यात दुरुस्ती केली तरी मागण्या मान्य होत नसल्याने अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे उपोषण मागे घ्यायला तयारच नव्हते. जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या.

जालना - जीआर काढला, त्यात दुरुस्ती केली तरी मागण्या मान्य होत नसल्याने अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे उपोषण मागे घ्यायला तयारच नव्हते. जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आ. नारायण कुचे यांनी गुरुवारी पहाटे जवळपास चार तास जरांगे पाटील आणि शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यानंतर गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आणि त्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगे यांनी उपोषण मागे घेतले.  

सर्वपक्षीयांच्या बैठकीनंतर जरांगे यांनी पाच अटी ठेवल्या होत्या. त्यानुसार बुधवारी मुख्यमंत्री येणार होते. परंतु, बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री गिरीश महाजन, आ. नारायण कुचे अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. त्यांनी जरांगे पाटील आणि शिष्टमंडळातील सदस्यांची भेट घेऊन चर्चा केली.

शासनाने घेतलेले निर्णय आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्या यात कोणता फरक आहे आणि त्यावर तोडगा कसा काढायचा यासाठी आम्ही बुधवारी मध्यरात्री मनोज जरांगे आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. चर्चेबाबत मध्यरात्री २ वाजताच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून माहिती दिली होती.  - रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री

रात्री काय काय घडले?रात्री १२ वाजता - ग्रामपंचायतमध्ये बंद दाराआड चर्चा रात्री १ः०५ वाजता - बंद दाराआड चर्चा संपवून जरांगे यांचे शिष्टमंडळ व आमदार नारायण कुचे उपोषणस्थळी. तिथे पुन्हा जवळपास ३५ मिनिटे चर्चा रात्री १:४० वाजता - आमदारांसह शिष्टमंडळ पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयात  पहाटे २:३० वाजता - सगळे जण पुन्हा उपोषणस्थळी. तिथे दानवे यांनी एक चिठ्ठी जरांगे यांना दाखवली व पुन्हा खिशात टाकली. त्या चिठ्ठीचा फोटो गिरीश महाजन यांनी त्यांच्या मोबाइलमध्ये काढून घेतला. पहाटे ३ वाजता - चर्चा संपली.सकाळी १०:४५ वाजता - मुख्यमंत्री अंतरवाली सराटीत दाखल.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना