क्षयरोगावर उपचार न घेणे इतरांसाठी घातक

By Admin | Updated: March 24, 2015 02:29 IST2015-03-24T02:29:54+5:302015-03-24T02:29:54+5:30

क्षयरोगावर उपचार न घेता तो तसाच कायम ठेवला तर एका रोग्याकडून वर्षभरात सुमारे १० ते १५ लोकांना या रोगाची लागण होण्याचा धोका डॉक्टरांनी अधोरेखित केला आहे.

Taking the treatment of tuberculosis is harmful for others | क्षयरोगावर उपचार न घेणे इतरांसाठी घातक

क्षयरोगावर उपचार न घेणे इतरांसाठी घातक

सावधान : एका रुग्णाकडून वर्षात १० ते १५ जणांना संसर्गाचा धोका
पूजा दामले- मुंबई
क्षयरोगावर उपचार न घेता तो तसाच कायम ठेवला तर एका रोग्याकडून वर्षभरात सुमारे १० ते १५ लोकांना या रोगाची लागण होण्याचा धोका डॉक्टरांनी अधोरेखित केला आहे.
क्षयरोगाचे निदान झाल्यानंतर तत्काळ उपचार सुरू न करणे, हे अत्यंत घातक ठरते. हा रोग टप्प्याटप्प्याने वाढत नाही. अचानक उसळून येतो. यामुळेच प्रत्येक दिवस धोक्याची तीव्रता वाढवत असतो. जास्त घनतेच्या परिसरात राहणाऱ्या, झोपडपट्टीसदृश ठिकाणी राहणाऱ्या लोकांना क्षयरोगाची लागण होण्याचा धोका अधिक असतो, असे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य सल्लागार डॉ. अरुण बामणे यांनी सांगितले.
भारतात दरवर्षी सुमारे ८ ते १० लाख नवे क्षयरोगाचे रुग्ण आढळून येतात. ३० लाख क्षयरोग रुग्ण दरवर्षी उपचार घेत असतात. भारतात क्षयरोगाचे विषाणू मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. आपल्याकडे स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. रस्त्यावर थुंकण्याच्या सवयीमुळे क्षयरोग वेगाने पसरतो, असे ग्लोबल रुग्णालयाचे श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. समीर गरदे यांनी सांगितले.
क्षयरोगामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण भारतात वाढत आहे. २०११ च्या आकडेवारीनुसार, भारतात २ ते ३ मिनिटाला एकाचा मृत्यू हा क्षयरोगामुळे होतो. क्षयरोगावर वेळीच उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र अजूनही याबाबत म्हणावी तितकी जनजागृती झालेली नाही. यामुळे क्षयरोगाचे काही रुग्ण मध्येच उपचार सोडून देतात. मध्येच उपचार सोडल्याने काही दिवसांतच क्षयरोगाचे विषाणू औषधांना दाद देत नाहीत.
अशा व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग झाल्यास त्यालाही औषधांना दाद न देणारा क्षयरोग होतो, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे डॉ. गरदे यांनी सांगितले.

च्क्षयरोग हा फक्त फुप्फुसांना नाही, तर केस आणि नखे सोडून शरीरातील सर्व अवयवांना होऊ शकतो. फुप्फुसांना होणाऱ्या क्षयरोगाचे प्रमाण ४० टक्के इतके असते.
च्मणका, हीप बोन, सांधे, मेंदू या अवयवांनादेखील क्षयरोग होण्याचे प्रमाण अधिक आहे. याचबरोबरीने काही वेळा क्षयरोग झाल्यास घशात गाठी येतात. फुप्फुसाचा क्षयरोग हा संसर्गजन्य असतो.
च्इतर कोणतेही क्षयरोग संसर्गजन्य नसतात. या क्षयरोगावर २४ ते २७ महिने उपचार घेतल्यास पूर्णपणे बरा होतो.

Web Title: Taking the treatment of tuberculosis is harmful for others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.