शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा एप्रिलमध्ये घ्या; निकाल ‘मे’मध्ये लावा; शिक्षण विभागाचे वरातीमागून घोडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 09:36 IST

राज्यात अनेक शाळांच्या परीक्षा संपत असून पालकांनी आपापल्या गावी जाण्याची तिकिटेही आरक्षित केली आहे. मात्र आता शिक्षण विभागाने गुरुवारी पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबई : राज्यातील अनेक शाळांनी पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा सुरू केल्या असताना परीक्षा एप्रिलमध्ये घ्या आणि निकाल मे महिन्यात लावा, असे अजब परिपत्रक गुरूवारी शिक्षण मंडळाने जारी केले. शिक्षण विभागाचे हे वरातीमागून घोडे असल्याची टीका होत आहे. राज्यात अनेक शाळांच्या परीक्षा संपत असून पालकांनी आपापल्या गावी जाण्याची तिकिटेही आरक्षित केली आहे. मात्र आता शिक्षण विभागाने गुरुवारी पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मे महिन्यात निकाल जाहीर करावेत, असेही निर्देशित केले आहे. राज्यात २४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासन आणि महापालिकांना शालेय शिक्षण विभागाने दिले होते. त्यानंतर आता राज्यात पहिली ते नववी आणि आणि अकरावीचे वर्ग पूर्णवेळ एप्रिलअखेर सुरू ठेवण्याच्या सूचना शिक्षण विभागाने गुरूवारी दिल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातून प्रचंड विरोध दरवर्षी पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत होऊन एप्रिल महिन्यात त्यांचे निकाल जाहीर केले जातात. यंदा शालेय शिक्षण विभागाकडून परीक्षांच्या बाबतीत काहीच सूचना न आल्याने अनेक जिल्ह्यातील शाळांनी परीक्षांना सुरुवात केली आहे. अनेक शाळांच्या तर परीक्षाही झाल्या आहेत. त्यामुळे आताच्या परिपत्रकामुळे परीक्षा सुरू न झालेल्या शाळांनी करायचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एप्रिलमध्ये परीक्षा घेण्यास पालकांचाही विरोध आहे.रविवारी शाळा भरवण्याची सूचनाnकोरोना काळातील विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शाळांनी शनिवारी पूर्णवेळ वर्ग सुरू ठेवून ऐच्छिक स्वरूपात रविवारीही वर्ग सुरू ठेवता येतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.nएप्रिलअखेर किंवा तिसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन मे महिन्यात निकाल जाहीर करावेत, असेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या १०० टक्के उपस्थितीस शिक्षण विभागाने परवानगी दिली.