शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आमदार जयकुमार गोरेंवरील आरोप गांभीर्याने घ्या; हायकाेर्टाने पोलिसांना झापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 07:19 IST

पोलिसांना ताकीद, २०० मृत कोरोना रुग्ण जिवंत दाखवून भ्रष्टाचार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाकाळात २०० पेक्षा अधिक मृत रुग्णांना जिवंत असल्याचे दाखवून निधीवाटपात घोटाळा केल्याचा आरोप असलेले भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप गांभीर्याने घ्या, अशी सक्त ताकीद  उच्च न्यायालयाने सातारा पोलिसांना दिली. 

पोलिसांनी सादर केलेल्या मृत्यू दाखल्यासंबंधी सर्व कागदपत्रांची आम्हीच छाननी करू. पोलिसांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र कचरा पेटीत टाकण्यासारखे आहे, असे न्यायालयाने म्हणताच तपास अधिकाऱ्यांना एसी कोर्टरूममध्ये घाम फुटला. एसी सुरू असताना तुम्हाला कसा घाम फुटला, असा प्रश्न उच्च न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना केला.

सरकारने कोरोना उपचारासाठी सर्व रुग्णालयांना आणि कोरोना सेंटर्सना मोफत औषधांचा साठा पुरविला होता.  सातारा जिल्ह्यातील मायणी-खटाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ताब्यात घेतले होते. या संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष जयकुमार गोरे होते. गोरे यांनी रुग्णांकडून औषधांचे पैसे घेतले, असा आरोप मायणी येथील दीपक देशमुख यांनी केला आहे.

जयकुमार गोरे यांनी २०० हून अधिक मृत रुग्णांना जिवंत दाखवून सरकारच्या विविध योजनांतून कोट्यवधी रुपये लाटले. डॉक्टरांच्या खोट्या  सह्या, बनावट कागदपत्रांच्या आधारे राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा गोरे यांनी गैरफायदा केला. त्यात त्यांच्या पत्नीचाही समावेश असल्याने गोरे व त्यांच्या पत्नी सोनिया गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी देशमुख यांनी याचिकेद्वारे केली आहे. 

सर्व प्रमाणपत्रांची छाननी करू...    सोमवारच्या सुनावणीत न्यायालयाने प्रथमदर्शनी घोटाळा झाल्याचे दिसत आहे, असे म्हटले. सर्व मृत्यू प्रमाणपत्रांची छाननी करू, असेही न्यायालयाने यावेळी म्हटले.

    मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले की, पोलिस कागदपत्रे तपासतील आणि पुन्हा प्रतिज्ञापत्र सादर करतील. गोरे यांच्यावर करण्यात आलेला भ्रष्टाचाराचा आरोप गांभीर्याने घ्या, असे म्हणत न्यायालयाने सुनावणी एक आठवडा तहकूब केली.

टॅग्स :Jaykumar Goreजयकुमार गोरेBJPभाजपाHigh Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस