शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

दोन दिवसांत तोडगा काढा; अन्यथा जिल्हापातळीवर आंदोलन करू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 05:40 IST

वैद्यकीय व दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला २५ मेपर्यंत मुदतवाढ मिळाली असली, तरी राज्य सरकारने या प्रवेशप्रक्रियेला सात दिवस स्थगिती दिली आहे.

मुंबई : वैद्यकीय व दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला २५ मेपर्यंत मुदतवाढ मिळाली असली, तरी राज्य सरकारने या प्रवेशप्रक्रियेला सात दिवस स्थगिती दिली आहे. त्यामुळे प्रवेश निश्चिती होईपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याच्या निधार्रामुळे विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन १० व्या दिवशीही सुरूच राहिले. दरम्यान, येत्या दोन दिवसात प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तोडगा न काढल्यास जिल्हा पातळीवर (जिल्हाधिकारी/ तहसीलदार कार्यालय) शांततेच्या मार्गाने ठिय्या, धरणे आंदोलने सुरू करण्याचा इशारा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिला आहे.बुधवारी मराठा क्रांती मोर्चाने परभणी, हिंगोली, नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी निवेदने दिली. दरम्यान, आंदोलनाच्या दहाव्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी आंदोलनस्थळाला भेटी दिल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू - छत्रपती संभाजी महाराजदरम्यान, आंदोलनाच्या दहाव्या दिवशी भाजपचे खासदार छ. संभाजी महाराज यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. राज्य शासनाने चांगल्या भावनेने मराठा आरक्षण दिले होते. काही त्रुटींमुळे आरक्षणाचा फटका मेडिकलच्या विद्यार्थ्यांना बसला. त्यातून आता हे आरक्षण न्यायालयात टिकेल, हे सिद्ध करण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांचे म्हणणे मांडून चर्चेतून तोडगा काढू असे, आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले असल्याची माहिती आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिली.

विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ शरद पवारांच्या भेटीलाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीदेखील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची बुधवारी भेट घेतली. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवास्थानी भेट घेतली आणि प्रवेशाचा तिढा सोडविण्याची मागणी केली. प्रवेशाचा हा तिढा सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे अश्वासन शरद पवार यांनी दिले असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. अमोल मातेले यांनी दिली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMedicalवैद्यकीय