सर्किट बेंचसाठी पंतप्रधानांची भेट घेऊ

By Admin | Updated: February 16, 2017 00:39 IST2017-02-16T00:39:44+5:302017-02-16T00:39:44+5:30

संभाजीराजे : बार असोसिएशनतर्फे सत्कार

Take a meeting with the Prime Minister for the circuit Bench | सर्किट बेंचसाठी पंतप्रधानांची भेट घेऊ

सर्किट बेंचसाठी पंतप्रधानांची भेट घेऊ

कोल्हापूर : सर्किट बेंच हा कोल्हापूरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न झाला आहे. त्यासाठी बार असोसिएशन आणि आपण एकत्र प्रयत्न केल्यास हा प्रश्न निश्चितच मार्गी लागेल. प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ, त्यांना साकडे घालू, असे आश्वासन खासदार संभाजीराजे यांनी दिले.
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने बुधवारी न्यायसंकुलामध्ये खासदार संभाजीराजे यांचा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश मोरे यांच्या हस्ते भारतीय संविधान पुस्तक तसेच शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एल. अवचट हे होते.
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरचा सर्किट बेंचचा प्रश्न हा अत्यंत गंभीर बनला आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी राजकारण म्हणून पाहू नये. हा प्रश्न तडीस नेण्यासाठी संघटित (पान ८ वर)


चॅलेंजिंग प्रश्न
मला चॅलेंजिंग विषय स्वीकारण्याची सवय आहे. त्यासाठी मी महाराष्ट्रातील गड, किल्ले संवर्धनाचा किचकट व चॅलेंजिंग विषय सोडविण्यासाठी घेतला आहे. अशा प्रश्नात राजकारणी लोकांना अजिबात रस नसतो, पण मी ज्या घरात जन्मलो, जेथे माझी जडण-घडण झाली, त्यासाठी हा प्रश्न हाती घेणे मला महत्त्वाचे वाटले, असेही खासदार संभाजीराजे म्हणाले.

Web Title: Take a meeting with the Prime Minister for the circuit Bench