शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

Chhagan Bhujbal : अवैध इंधन, बनावट बायोडिझेल विक्री रोखण्यासाठी तातडीने कारवाई करा, छगन भुजबळांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 22:39 IST

Chhagan Bhujbal : राज्यातील बंदरांच्या माध्यमातून होणाऱ्या अवैध बायोडिझेलचे इंपोर्ट तसेच साठवणूक, पुरवठा व विक्री करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

मुंबई : राज्यातील अवैध इंधन (Fuel)आणि बायोडिझेल (Biodiesel)विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम आखून त्यानुसार जिल्हा स्तरावर पथके स्थापन करणे गरजेचे आहे. अवैध इंधन विक्रीमुळे केंद्र शासन व राज्यशासनाच्या महसूलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत केंद्र शासनाला पत्रव्यवहार करुन अवगत करणे गरजेचे आहे.राज्यातील अवैध बायोडिझेल विक्रीसंदर्भात कार्यवाही करण्याची प्रक्रिया जलद गतीने वाढवावी, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिले. (Take immediate action to stop sale of illegal fuel, fake biodiesel, Chhagan Bhujbal instructs)

आज मंत्रालयात राज्याचे बायोडिझेल (उत्पादन, साठवणूक, पुरवठा व विक्री ) धोरण 2021 बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे,शिधावाटप संचालक कान्हूराज बगाटे, कोकण विभागाचे पुरवठा उपायुक्त विवेक गायकवाड, औरगाबाद विभागाचे पुरवठा उपायुक्त वामन कदम, पुणे विभागाचे पुरवठा उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी, उपनियंत्रक शिधावाटप प्रशांत काळे, उपनियंत्रक लिलाधर दुफाटे, नाशिक विभागाचे साहेबराव सोनवणे, तेल उद्योग विभागाचे राज्य समन्वयक सतीश निवेदकर, मुख्य प्रबंधक राज्य समन्वयक मनोहर अनभोरे, महाप्रबंधक रिटेल सेल्स इंडियन आईल कं. लि. शशांक मेश्राम, मुख्य प्रबंधक रिटेल सेल्स इंडियन आईल कॉ. लि प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी, बायोडिझेलचे अवैध उत्पादन, साठवणूक, पुरवठा व विक्री करण्याऱ्या विरुद्ध कडक कारवाई सूचना त्यांनी यावेळी केली. राज्यातील बंदरांच्या माध्यमातून होणाऱ्या अवैध बायोडिझेलचे इंपोर्ट तसेच साठवणूक, पुरवठा व विक्री करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

याचबरोबर, केंद्र सरकारने केवळ ब्लेंडिंगसाठी फ्युअल ऑईल मिश्रित बायोडिझेल विकण्याची परवानगी दिली आहे. सोबत अट घातली आहे की पेट्रोल-डिझेल पंपासारखी बायोडिझेल पंप उघडण्यासाठी परवाना व मंजुरी घेणे आवश्यक आहे. परंतु अनेक लोक विना परवाना व मंजुरी न घेता बायोडिझेल पंप सुरू करीत आहे. येथे ब्लेंडिंग न करता पूर्ण टाकी बायोडिझेलने भरण्यात येत आहे. परवानगी नसतानाही विना परवाना बायोडिझेल विक्री करण्यात येत असल्याने सरकारचे वर्षाला हजारो कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर पथक नेमून पथकांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात तपासणी मोहीम काटेकोरपणे राबवून अवैध बायोडिझेल, बनावट डिझेलची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार कारवाई करावी व त्याचा अहवाल शीघ्रतेने जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा, असे छगन भुजबळ म्हणाले.

केंद्र शासनाने बायोडिझेल संदर्भात धोरण निश्चित केले असून त्याची अंमलबवणी करणे गरजेचे आहे. यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून त्यांनी ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे.यासंदर्भात मोहिम आखून या कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे. बायोडिझेल धोरणाची अंमलबजावणी करायची असेल तर संबंधितांवर या प्रकरणामध्ये कडक झाली पाहिजे. केंद्र शासनाला पत्रव्यवहार करुन बायोडिझेलचे अवैध उत्पादन, साठवणूक, पुरवठा व विक्री यामुळे केंद्र व राज्याच्या कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे हे अवगत करावे तसेच ज्वालाग्रही पदार्थ विनापरवानगी विकत असतील  तर त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी अशी माहिती छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळMaharashtraमहाराष्ट्र