शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Porsche Accident : अपहरण, दबाव, पैशांच्या जोरावर पोर्शे कार अपघाताची थेरी बदलण्याचा कट; 'तो' फोन उलगडणार गुपितं
2
महात्मा गांधी म्हणजे सूर्य, शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे PM मोदींना उत्तर
3
विशेष लेख: २२०च्या आत? २५० ते २६०, की ३०० ते ३५०? भाजपाला नक्की 'किती' मिळतील?
4
आजचे राशीभविष्य - 30 मे 2024; आजचा दिवस शुभ फलदायी, मित्रांकडून लाभ होतील, अचानक धनलाभ संभवतो
5
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
6
"तुम्हाला नोकरीवरुन काढून टाकू.," Raghuram Rajan यांना कोण देत होतं धमकी; नंतर RBI गव्हर्नरांनी काय केलं?
7
स्वामीपूजन, आरती झाल्यावर आवर्जून म्हणा ‘स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली’; होईल स्वामीकृपा!
8
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
9
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
10
अन्वयार्थ विशेष लेख: वाघ बघितलाच पाहिजे आणि तो पण जवळून; हा कसला हट्ट?
11
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
12
अग्रलेख: कळ्या-फुलांचा ‘बाजार’! बेपत्ता बालकांमध्ये मुलींच्या प्रमाणात दरवर्षी वाढ
13
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
14
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
15
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
16
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
17
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
18
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
19
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
20
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!

परीक्षा ऑफलाइन घ्या, पण सध्या नको; दहावी, बारावीसाठी मराठी शाळा संस्थाचालक संघाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 2:15 AM

शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षांबाबत घाईने शेवटच्या टप्प्यात निर्णय न घेता त्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी मराठी शाळा संस्थाचालक संघाने केली.

मुंबई : आजच्या परिस्थितीत सरकार घेत असलेले निर्णय व झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहता शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षांबाबत घाईने शेवटच्या टप्प्यात निर्णय न घेता त्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी मराठी शाळा संस्थाचालक संघाने केली.मूल्यमापन व परीक्षेचे स्वरूप शिथिल करून मुक्त वातावरणात परीक्षा घेण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने विचार करावा, यामध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचाही अंतर्भाव असावा असे मत संघाने मांडले. मराठी शाळा संस्थाचालकांची ही भूमिका आपण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाच्या स्वरूपात मांडल्याची माहिती मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्रकाश परब यांनी दिली.परीक्षेच्या कार्याचे विकेंद्रीकरण करून स्थानिक पातळीवर विभागावर किंवा जिल्हानिहाय जिथे परीक्षा घेण्यायोग्य परिस्थिती आहे अशा ठिकाणी परीक्षा घेण्यासोबत पेपर तपासणीसुद्धा स्थानिक पातळीवर करता येईल का, असा विचार शिक्षण विभागाने करायला हवा. तसेच परीक्षेचे नियोजन करण्याआधी कोणत्याही वयोगटाचा विचार न करता सर्व शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सरसकट लसीकरण करून विद्यार्थ्यांच्याही लसीकरणासाठी विचार व्हावा असे मत शाळा संस्थाचालकांनी मांडले.७ एप्रिल रोजी मराठी शाळा संस्थाचालक संघाची बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली. त्यात राज्याच्या सहा ते सात जिल्ह्यांतील २५ ते ३० मराठी शाळा संस्थाचालकांनी सहभाग नोंदविला होता. परीक्षा ऑफलाइन व्हाव्यात, पण सध्या नकाे, असे मत मांडण्यात आले.­सुरक्षा महत्त्वाची!ग्रामीण परिस्थिती, कनेक्टिव्हिटी, गुणवत्तेचा विचार करता दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच व्हावी; मात्र विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात घालून, मानसिक ताण देऊन नकाे, असे संस्थाचालकांचे मत असल्याचे शाळा संस्थाचालक संघाचे समन्वयक सुशील शेजुळे यांनी सांगितले.