शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

'धनुष्यबाण'सह शिवसेना भवनावरही ताबा?; बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 06:04 IST

शिवसेनेच्या ताब्यावरून संघर्ष; उद्धव ठाकरे गटाकडून प्रतिज्ञापत्रे;  एकनाथ शिंदे गटही होणार सक्रिय

मुंबई : शिवसेनेत मोठे बंड घडवून आणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट यांच्यात शिवसेनेवरील ताब्यावरून आगामी काळात मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. शिवसेनेने जिल्ह्याजिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून पक्षनिष्ठेची प्रतिज्ञापत्रे भरून घेण्याचे धोरण आखले आहे. विधानसभेत विश्वासमत सिद्ध केल्यानंतर शिंदे गटाकडूनही शिवसेनेवरील वर्चस्वासाठी तयारी सुरू केली जाणार आहे. 

शिवसेना पक्ष, शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि मुंबईतील शिवसेना भवनवरील ताब्यावरून शिंदे गट आगामी काळात हालचाली करू शकतो याचा अंदाज आल्याने शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू आहे. या अनुषंगाने पुढे न्यायालयात प्रकरण गेले तर जिल्ह्याजिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विश्वास उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर असल्याचे सिद्ध करण्यासाठी या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेना कुणाची हा प्रश्न उभा ठाकला आहे.

मनसेने केला सवाल‘मी आयुष्यभर शिवसेनेतच राहीन. माझा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे’ असे प्रतिज्ञापत्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून भरून घेतले जात आहे आणि त्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याला भुर्दंड सहन करावा लागत आहे, असा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शनिवारी केला. शिवबंधन बांधलेल्या पदाधिकाऱ्यांवर विश्वास नाही का, ‘आम्ही हिंदुत्व सोडणार नाही’ असे प्रतिज्ञापत्र शिवसेनेच्या नेतृत्वानेही द्यायला हवे.

प्रवीण दरेकर यांची टीकाभाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना प्रतिज्ञापत्रच भरून घेणार असेल तर ते संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांकडून भरून घ्यावे, कारण राऊत हे राष्ट्रवादीच्या ओंजळीने पाणी पितात, अशी टीका केली. आपल्याच पदाधिकाऱ्यांवर शिवसेना नेतृत्वाचा विश्वास नाही का, असा सवाल त्यांनी केला. शिवसेनेचे प्रवक्ते खा. अरविंद सावंत यांनी, अशी प्रतिज्ञापत्रे भरून घेतली जात असल्याचा इन्कार केला. आमच्या पक्षात आम्ही काय करतो याचा भाजप अन् मनसेशी काय संबंध, असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना