उष्माघातापासून सुरक्षा करण्यासाठी घ्या ही काळजी
By Admin | Updated: March 29, 2017 11:09 IST2017-03-29T11:09:55+5:302017-03-29T11:09:55+5:30
हवेतील सापेक्ष आर्द्रता कमालीची कमी झाल्याने मुंबईसह राज्यात चैत्र महिन्यातच उन्हाचे चटके जाणवत आहेत.

उष्माघातापासून सुरक्षा करण्यासाठी घ्या ही काळजी
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - हवेतील सापेक्ष आर्द्रता कमालीची कमी झाल्याने मुंबईसह राज्यात चैत्र महिन्यातच उन्हाचे चटके जाणवत आहेत. मुंबईत समुद्रामुळे आर्द्रता अधिक असते मात्र येथील हवासुद्धा कोरडी झाल्याने मुंबईकरांच्या जिवाची काहिली होत आहे. मराठवाड्याच्या संपूर्ण भागात, विदर्भ, मध्य महाराष्ट्र व कोकण-गोव्याच्या काही भागांत आणि विदर्भाच्या उर्वरित भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
कडाक्याच्या उकाड्यामुळे लोकांना घराबाहेर पडणं त्रासदायक झालं आहे. यातच बीडमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. रुपाबाई पिसळे (67) यांचा उष्माघातामुळे बळी गेला आहे. रुपाबाई पिसळे या केज तालुक्यातील नांदुरघाटातील रहिवासी होत्या.
उष्माघातापासून सुरक्षेसाठी या दक्षता घ्या
हे करा
1. तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या.
2. सौम्य रंगाचे, सैल आणि कॉटनचे कपडे वापरा.
3. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.
4. प्रवास करताना सोबत पाण्याची बॉटल घ्यायला विसरू नका.
5. आपलं घरं थंड ठेवा, पडदे लावा, सनशेड बसवा आणि शक्य असल्यास रात्री खिडक्या उघड्या ठेवा.
6. उन्हात डोक्यावर छत्री, टोपीचा वापर करा. डोके, गळा, चेह-यासाठी ओल्या कपड्याचा वापर करा.
7. अशक्तपणा, कमजोरपणा जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
8. ओआरएस, घरातील लस्सी, तोरणी, लिंबू पाणी किंवा ताक इत्यादी प्या.
9. जनावरांनाही सावलीत ठेवा आणि पुरेसे पाणी द्या.
10. थंड पाण्याचा आंघोळ करा.
हे करू नका
1. दुपारी 12 ते 3 उन्हात फिरू नका.
2. मद्यसेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ ड्रिंक्स पिणं टाळा, त्यामुळे डिहायड्रेशन होतं.
3. उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळं अन्न खाऊ नका.
4. पार्किंग केलेल्या वाहनात मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका.
यंदा सरासरी ९५ टक्के पाऊस : जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात देशभरात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेट संस्थेने व्यक्त केला आहे़ त्यात ५ टक्के कमी-अधिक फरक पडू शकतो़ देशभरात ८८७ मिमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़ एलनिनोचा प्रत्यक्ष प्रभाव जुलैनंतर जाणवण्याची शक्यता आहे. जूनमध्ये १०२, जुलैमध्ये ९४, आॅगस्टमध्ये ९३ तर सप्टेंबरमध्ये ९६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.