शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

साखर खरेदीवर बहिष्कार टाका

By admin | Updated: December 26, 2014 04:28 IST

राज्यातील बहुजनांचे नेतृत्व करणा-या विविध संघटनांनी एकत्र येत साखरेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे

मुंबई : राज्यातील बहुजनांचे नेतृत्व करणा-या विविध संघटनांनी एकत्र येत साखरेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील दलित अत्याचारांच्या घटनांमध्ये धनदांडगे साखर कारखानदार आणि या उद्योगाशी संबंधितांचा संबंध असल्याचा आरोप साखर बहिष्कार कृती समितीने आज केला. या सर्वांचा आर्थिक स्रोत मोडून काढण्यासाठी बहिष्कार आंदोलन करणार असल्याचा दावा या समितीने केला.कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात या बहिष्कार आंदोलनाचे कार्यक्रम राबवण्यात येतील, अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक अमोल मडामे यांनी दिली. मडामे म्हणाले, ‘राज्यातील बहुसंख्य दलित अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये जातीय हात असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले. त्यांना सहकार किंवा साखर उद्योगाची अर्थव्यवस्था मोलाची मदत करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. खैरलांजी, सोनई, खर्डा येथील हत्याकांडांची प्रकरणे ही त्याची अलीकडची उदाहरणे आहेत. त्यामुळे आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून साखरेवर बहिष्कार टाकत आहारातून साखर वर्ज्य करणार आहे.’ कृती समितीच्या समन्वयक अपेक्षा दिवाण म्हणाल्या, ‘साखर उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या ऊसामुळे भौगोलिक परिस्थितीही ढासळत आहे. कारण सरासरी हेक्टरी ऊसाला २० हजार लिटर पाणी लागते. तर साखर निर्मिती करताना किलोमागे सुमारे ८८४ ते १ हजार १५७ लिटर एवढे पाणी लागते. उसासाठी आणि साखर कारखान्यांसाठी असा अतिप्रचंड प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. त्यामुळे इतर पिके घेण्यासाठी पाणीटंचाई निर्माण झाल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे. अतिप्रमाणात ऊस लागडवाडीमुळे जमीनसुद्धा खारवट व पाणथळ होऊन नापीक होत आहे. त्यामुळे साखरेवर बहिष्कार टाकल्यास ऊस लागवडीचे प्रमाणही आटोक्यात ठेवता येईल.’ दैनंदिन जीवनात साखरेचा वापर पाहता ती वर्ज्य करणे कितपत शक्य असल्याचे विचारले असता केशवपन प्रथेविरोधात आवाज उठवताना फुले यांनी न्हावी समाजाचा अशक्य वाटणारा संप घडवून आणल्याचा दाखला दिला. ही बाब खूपच कठीण असल्याने राज्यभर त्याबाबत टप्प्याटप्प्याने जनजागृती करणार असल्याचेही सांगितले. (प्रतिनिधी)