पावसाळ्यात घ्या संतुलित आहार

By Admin | Updated: June 29, 2016 02:37 IST2016-06-29T02:37:42+5:302016-06-29T02:37:42+5:30

पावसाळा सुरू झाल्यावर वातावरणातील बदलांमुळे आहारातही बदल करणे आवश्यक असते.

Take a balanced diet in rainy season | पावसाळ्यात घ्या संतुलित आहार

पावसाळ्यात घ्या संतुलित आहार


मुंबई : पावसाळा सुरू झाल्यावर वातावरणातील बदलांमुळे आहारातही बदल करणे आवश्यक असते. पावसाळ््यात चटपटीत, खमंग पदार्थ खाण्याची इच्छा होते, पण या पदार्थांपेक्षा घरातील शिजवलेले अन्न खाल्ले पाहिजे. त्यामुळे पावसाळ््यात होणाऱ्या कावीळ, डायरियासारख्या आजारांना टाळता येते.
पावसाळ््यात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी चिंच, मेथी, लसूण, कांदा या पदार्थांचे सेवन करावे.
आले आणि लसणीमध्ये असणाऱ्या सल्फरमुळे विषाणूंपासून संरक्षण मिळते. पावसाळ््यात हवेत थंडावा असल्यामुळे दिवसभरात तहान जास्त लागत नाही, पण तरीही दिवसातून १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पाऊस पडत असताना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या भजी, चाटच्या स्टॉलकडे सर्रास सर्वांचे पाय वळतात. पावसात भिजत हे पदार्थ खाणे लोक एन्जॉय करतात, पण असे एन्जॉय करणे टाळावे. यापेक्षा घरी शिजवलेले पदार्थ खावेत.
मधुमेही रुग्णांनी विशेष करून पावसाळ््यात काळजी घेतली पाहिजे. मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या शरीराला ग्लुकोजचे विघटन करून त्यापासून शक्ती निर्माण करता येत नाही.
त्यामुळे शरीरातील शर्करेचे प्रमाण वाढते व शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. प्रतिकारशक्ती कमी झाल्याने मधुमेही व्यक्ती अनेक आजारांना बळी पडतात. त्यामुळे मधुमेहींनी पावसाळ््यात खाण्याच्या वेळा पाळल्या पाहिजेत, असे मधुमेह तज्ज्ञ डॉ. प्रदीप गाडगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Take a balanced diet in rainy season