ताज हॉटेल, विमानतळ उडविण्याची धमकी

By Admin | Updated: September 30, 2015 02:13 IST2015-09-30T02:13:02+5:302015-09-30T02:13:02+5:30

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याहून गंभीर हल्ला होणार असल्याची माहिती विमानतळाच्या नियंत्रण कक्षाला सोमवारी मिळाल्याने खळबळ उडाली.

Taj hotel, threatening to blow up the airport | ताज हॉटेल, विमानतळ उडविण्याची धमकी

ताज हॉटेल, विमानतळ उडविण्याची धमकी

मुंबई: २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याहून गंभीर हल्ला होणार असल्याची माहिती विमानतळाच्या नियंत्रण कक्षाला सोमवारी मिळाल्याने खळबळ उडाली. अतिरेकी मुंबईतील ताज हॉटेलसह आंतरराष्ट्रीय व डोमॅस्टिक विमानतळावर हल्ला करणार असल्याच्या कॉलमुळे पोलिसांनी हायअलर्ट जारी केला आहे.
विमानतळाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मुंबईत हल्ला होणार असल्याचा इंटरनेट कॉल आला.. विलेपार्ले येथील डोमेस्टिक एअरपोर्ट परिसरात असताना तीन तरुण ताज हॉटेलसह आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टिक विमानतळावर हल्ला करणार असल्याची चर्चा करत असल्याची माहिती एकाने फोनद्वारे दिली. नियंत्रण कक्षाने त्वरीत ही माहिती सीआयएसएफकडे दिली. या माहितीननंतर मुंबई पोलिसांनी सतर्कता म्हणून सुरक्षा यंत्रणेत वाढ केली. विमानतळ परिसरात बॉम्बशोधक पथकासक श्वानपथक दाखल झाले. तपासप्रक्रियेचा विमानतळाच्या वेळापत्रकावर परिणाम झाला नाही. (प्रतिनिधी)
---------
९ महिन्यांत १४ कॉल, ३ पत्रे
सप्टेंबर २०१५पर्यंत मुंबईतील विमानतळांवर अशा स्वरुपाचे १४ अशा स्वरुपाचे कॉलसह ३ धमकीची पत्रे आली आहेत. यापैकी ८ फोन हेठाणे एअर इंडिया, २ जेट एअरवेज आणि इतर फोन हे विमानतळ नियंत्रण कक्षाला आले आहेत.
पैकी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात विमानतळाच्या शौचालयातील टिशू पेपरवर धमकीचे मेसेज देण्यात आले होते.
---------
तातडीची बैठक बोलावली
मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. कॉलचे गांभीर्य लक्षात घेऊन सतर्कता म्हणून या ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला असल्याची माहिती देवेन भारती यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Taj hotel, threatening to blow up the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.