शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 07:54 IST

लाखो हातांना काम मिळू शकते पण... गमावतोय मोठी संधी

पवन देशपांडे

मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक सेमिकंडक्टर कंपन्यांसाठी भारताची दारे उघडली असून, त्यात फॉक्सकॉनसह अनेकांनी गुजरात, उत्तर प्रदेश आणि ओडिशामध्ये प्रकल्प सुरू करण्याचे काम हातीही घेतले आहेत. अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या वाटेवर होते. बोलणीही झाली होते. पण बड्या कंपन्या गमावून महाराष्ट्र अब्जावधी रुपयांची गुंतवणूक आणि लाखो हातांना काम मिळवून देण्याच्या संधीला मुकला आहे.

२०१५ मध्ये तैवानच्या फॉक्सकॉनसोबत ५ अब्ज डॉलर्सचा करार झाला होता. तो सुवर्णसंधी ठरला असता, पण गुंतवणूक प्रत्यक्षात उतरली नाही. अशाच तैवानच्या अनेक कंपन्या महाराष्ट्राच्या मार्गावरून इतर राज्यांत खासकरून तामिळनाडूत गेल्या आहेत. २०२३ मध्येही पाऊ चेन या फुटवेअर बनविणाऱ्या तैवानच्या कंपनीने महाराष्ट्र सरकारबरोबर करार केला होता. पण पाऊ चेनने तामिळनाडूत गुंतवणूक केली. महाराष्ट्राला अशाच अनेक कंपन्यांचे वायदे होऊन, गुंतवणूक दुसरीकडे वळू लागल्याचे दिसते आहे.

तज्ज्ञांच्या मते, तामिळनाडू काय करतेय?

१. तैवान व दक्षिण कोरियन कंपन्यांसाठी उद्योग सहाय्यक आणि संस्कृती अनुकूल सल्लागार नेमले. विशेष आर्थिक क्षेत्र, 'प्लग-अँड-प्ले' तयार भूखंड निर्माण केले.

२. ‘Guidance Tamil Nadu’ नावाचे सशक्त गुंतवणूक प्राधिकरण तयार केले.

३. सुलभ परवाना प्रक्रिया उद्योग मेत्री जोडली. उत्पादन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जलद अंमलबजावणी केली.  पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या.

४. वेगवेगळे क्लस्टर जलद गतीने निर्माण केले. जमिनी उपलब्ध करून दिल्या, तैवान क्लस्टर निर्माण केले.

५. भारतातील सर्वोच्च इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

इलेक्ट्रॉनिक निर्मिती क्षेत्रातील

सेमिकंडक्टर, वेफर्स, इन्सोस, सोलर

पीव्ही मॉड्यूल, सोलर पॅनेल, लिथियम आयन बॅटरी, इलेक्ट्रोलायझर निर्मितीच्या १४ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील नागपूर हे सेमीकंडक्टर आणि लिथियम आयन बॅटरी निर्मितीचे हब तसेच छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे हब बनविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

उदय सामंत, उद्योग मंत्री

राज्यनिहाय इलेक्ट्रॉनिक्स निर्यात

राज्य   निर्यात मूल्य    राष्ट्रीय वाटा

तामिळनाडू      ९.५६ अब्ज डॉलर्स ३३%

कर्नाटक ४.६ अब्ज डॉलर्स १६%

उत्तर प्रदेश      ४.४६ अब्ज डॉलर्स १५.३२%

महाराष्ट्र ३ अब्ज डॉलर्स   १०.६२%

तामिळनाडू हे भारतातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार राज्य राहिले असून, वित्तीय वर्ष २०२३-२४ मध्ये ९.५६ अब्ज डॉलर्स इतकी निर्यात करत तामिळनाडूने राष्ट्रीय निर्यातीच्या ३२.८४% इतका वाटा उचलला. मागील वर्षाच्या तुलनेत ही निर्यात ७८% नी वाढली आहे.

फॉक्सकॉन, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, सॅलकॉम्प, पेगाट्रॉन यांसारख्या भारतातील पंधराहून अधिक प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार कंपन्या तामिळनाडूमध्ये कार्यरत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, कुठे कमी पडतोय महाराष्ट्र?

१. पुरवढा साखळी समजून घेणे व तैवान विशेषज्ञ व अनुभवी मार्गदर्शक नेमणे.

२. परकीय गुंतवणूकदारांच्या चौकशांना वेळत उत्तर देणे. इच्छुक कंपन्यांशी सतत संपर्क ठेवणे व त्याचा पाठपुरावा घेणे.

३. परदेशी कंपन्यांसाठी प्रक्रिया गतिमान करणे. वेगवेगळे क्लस्टर्स लवकर पूर्ण करून गुंतवणूकदारांना आकर्षित करणे.

४. स्थानिक तैवान-विशेषज्ञ, भाषाशास्त्रज्ञ आणि क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शक यांचा समावेश करणे अत्यावश्यक आहे.

५. मंदारिन भाषेचं ज्ञान असलेले किंवा तैवानमध्ये प्रत्यक्ष अनुभव असलेले विषयतज्ज्ञ निर्णय प्रक्रियेत घ्यावे.

आंतरराष्ट्रीय गुंतवणूक संधी वाढवण्यासाठी महाराष्ट्र दक्षिण आशियातील देशांसाठी एक इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट डेस्क स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहे. यात तैवानही आहे. कंपन्यापर्यंत पोहोचणे, गुंतवणूक सुलभ करणे आणि आर्थिक संबंध दृढ करणे, हा या उपक्रमाचा उद्देश  आहे.

डॉ.पी.अनबलगन, सचिव, उद्योग विभाग