तहसीलदारांच्या गाडी चालकास वाळू तस्करांनी धमकावले
By Admin | Updated: December 30, 2014 01:12 IST2014-12-30T01:12:52+5:302014-12-30T01:12:52+5:30
तहसीलदारांच्या वाहन चालकास घरी जाऊन धमकाविल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली़ या प्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल झाला आहे़

तहसीलदारांच्या गाडी चालकास वाळू तस्करांनी धमकावले
कोपरगाव : ‘तुझ्या सांगण्यावरून आमच्या वाळू व्यवसायावर कारवाई केली जाते’, असे म्हणून तहसीलदारांच्या वाहन चालकास घरी जाऊन धमकाविल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली़ या प्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल झाला आहे़
घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कोपरगावच्या तहसीलदार इंदिरा चौधरी यांच्या वाहनाचे चालक दिलीप रावसाहेब घोरपडे हे रविवारी आपल्या पंचायत समिती जवळील घरी होते़ सायंकाळी त्यांच्या घरी दीपक मुरलीधर औताडे, कैलास मंजूळ (पूर्ण नाव माहीत नाही) व अन्य पाचजण आले़ तुझ्या सांगण्यावरून महसूलचे पथक आमच्यावर कारवाई करते़ या पुढे कारवाई झाली तर तुला बघून घेऊ, अशी दमबाजी घोरपडे यांना केली. तशा आशयाची तक्रार दिलीप घोरपडे यांनी पोलिसांत दिली़ या तक्रारीवरून सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़ (प्रतिनिधी)