म्हसळा येथे तहसीलदारांना रेतीमाफियांची मारहाण

By Admin | Updated: April 6, 2015 03:26 IST2015-04-06T03:26:41+5:302015-04-06T03:26:41+5:30

विनापरवाना रेती उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आंबेत येथे गेलेल्या म्हसळा तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी वीरसिंग वसावे,

Tahsildar assaulted the ladies in Mhasla | म्हसळा येथे तहसीलदारांना रेतीमाफियांची मारहाण

म्हसळा येथे तहसीलदारांना रेतीमाफियांची मारहाण

म्हसळा : विनापरवाना रेती उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आंबेत येथे गेलेल्या म्हसळा तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी वीरसिंग वसावे, नायब तहसीलदार धनंजय कांबळे, तलाठी सदानंद वारगडे, कल्याण देऊळगावकर, दत्तू कर्चे यांना मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली.
या घटनेची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. म्हसळा तहसीलदार वीरसिंग वसावे हे श्रीवर्धन प्रांताधिकारी तेजस समेळ यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यासाठी पथकासह आंबेत बस स्थानकाजवळ गेले होते. म्हाप्रळ बाजूकडून रेतीने भरलेले तीन ट्रक जाताना दिसले असता त्यांनी पाठलाग केला. ट्रक थांबवण्याचा प्रयत्नही केला, मात्र ट्रक निघून गेले. पळून जाणाऱ्या ट्रकला खाजगी वाहनाने पाठलाग करून वाहन आडवे घालून अडवले असता पाठीमागून येणारे दुसरे दोन ट्रक येऊन थांबले. तीन ट्रकची पाहणी केली असता प्रत्येक वाहनामध्ये पाच ब्रास रेती असल्याचे निदर्शनास आले. रेती वाहतूक परवाना नसल्याने कायदेशीर कारवाई सुरू करण्यात अली, मात्र तेव्हाच आंबेत बाजूकडून वाहनांनमधून काही लोक आले व त्यांनी तहसीलदार व त्यांच्या सोबत असलेले नायब तहसीलदार, कर्मचारी यांना अर्वाच्य शिवीगाळ व धक्काबुक्की केली. लाकडी दांडक्यांनी जीवे ठार मारण्याची धमकी देऊन रेतीने भरलेले तीनही ट्रक पळवून नेले. घटनेची तक्रार म्हसळा तहसीलदारवीरसिंग वसावे यांनी दिल्यानंतर गोरेगाव पोलीस ठाण्यात फैयाज पेवेकर, ट्रक चालकांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Tahsildar assaulted the ladies in Mhasla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.