नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी
By Admin | Updated: January 6, 2016 02:15 IST2016-01-06T02:15:17+5:302016-01-06T02:15:17+5:30
विधान परिषदेतील नवनिर्वाचित आमदार रामदास कदम, प्रशांत परिचारक, अमरीश पटेल, भाई जगताप, सतेज पाटील, गिरीष व्यास, गोपीकिशन बाजोरिया आणि अरुण जगताप यांनी विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ घेतली.

नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी
मुंबई : विधान परिषदेतील नवनिर्वाचित आमदार रामदास कदम, प्रशांत परिचारक, अमरीश पटेल, भाई जगताप, सतेज पाटील, गिरीष व्यास, गोपीकिशन बाजोरिया आणि अरुण जगताप यांनी विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ घेतली.
विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडून शपथ ग्रहण केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह विधिमंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. शपथविधीनंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेस विधिमंडळ पक्ष कार्यालयात काँग्रेसच्या आमदारांचा सत्कार केला. (प्रतिनिधी)