स्वाईन फ्लूची विदर्भात दहशत
By Admin | Updated: February 3, 2015 01:04 IST2015-02-03T01:04:30+5:302015-02-03T01:04:30+5:30
‘स्वाईन फ्लू’ने पुन्हा डोके वर काढले आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ३४ रुग्ण स्वाईन फ्लूचे पॉझिटिव्ह आले असून ११ जणांचा बळी गेला आहे, तर अमरावती जिल्ह्यात दोन संशयित रुग्ण आढळून आले आहेत.

स्वाईन फ्लूची विदर्भात दहशत
एकाच महिन्यात ११ जणांचा बळी: अमरावतीत दोन रुग्ण
अमरावती/नागपूर : ‘स्वाईन फ्लू’ने पुन्हा डोके वर काढले आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ३४ रुग्ण स्वाईन फ्लूचे पॉझिटिव्ह आले असून ११ जणांचा बळी गेला आहे, तर अमरावती जिल्ह्यात दोन संशयित रुग्ण आढळून आले आहेत.
सोमवारी मेडिकल रुग्णालयातून दोन संशयितांचे नमुने मेयो रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सायंकाळी आलेल्या अहवालात त्यापैकी एकाला ‘स्वाईन फ्लू’ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. ‘स्वाईन फ्लू’बाधित १६ वर्षीय तरुण हिंगणघाटचा आहे. सध्या मेडिकल रुग्णालयात सहा रुग्ण उपचार घेत असून एकाची प्रकृती गंभीर आहे.
अमरावतीत दोन संशयित रुग्ण
अमरावती शहरात ‘स्वाईन फ्लू’ या आजाराचे दोन संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. इर्विन रुग्णालयातील ‘स्वाईन फ्लू’च्या वॉर्डात २०० टॅमी फ्लू गोळ्यांचा साठा पुरविण्यात आला. नांदगाव पेठ येथील एका संशयित रुग्णाचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची चर्चा असून शहरातीलच डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये २७ जानेवारी रोजी ३० वर्षे वयोगटातील संशयित रुग्ण दाखल करण्यात आला आहे. या रुग्णावर तेथील डॉक्टरांनी टॅमी फ्लूचे उपचार सुरू केले आहेत. इतकेच नव्हे, तर या रूग्णाने जिल्हा सामान्य रूग्णालयात ‘थ्रोट स्वॅप’च्या तपासणीसाठी हजेरी लावली. त्याने जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या ‘स्वाईन फ्लू’ वॉर्डात टॅमी फ्लूच्या गोळ्यांची मागणी केली आहे. स्वाईन फ्लूचा दुसरा संशयित रुग्ण ५५ वर्षांचा असून तो कॉटन मार्केट परिसरातील रहिवासी असल्याची माहिती इर्विनच्या सूत्रांकडून मिळाली. त्याचा एक नातेवाईक नागपूर येथील रुग्णालयात य्उपचार घेत आहे. (प्रतिनिधी)