स्वाईन फ्लू रोखला!

By Admin | Updated: April 8, 2015 01:17 IST2015-04-08T01:17:14+5:302015-04-08T01:17:14+5:30

स्वाईन फ्लू रोखण्यासाठी राज्य सरकारने योग्य पावले उचलली असल्याचा दावा करतानाच अशाप्रकारच्या साथीच्या रोगांशी मुकाबला करण्यासाठी सर्व

Swine flu prevented! | स्वाईन फ्लू रोखला!

स्वाईन फ्लू रोखला!

मुंबई : स्वाईन फ्लू रोखण्यासाठी राज्य सरकारने योग्य पावले उचलली असल्याचा दावा करतानाच अशाप्रकारच्या साथीच्या रोगांशी मुकाबला करण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा एका छताखाली आणून उपाययोजना करता यावे, यासाठी कायदा करण्याचा सरकारचा मानस असल्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी विधान परिषदेत सांगितले.
काँग्रेसचे संजय दत्त यांनी स्वाईन फ्लूबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले की, साथीचे व संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा एकाच छताखाली आणण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कायदा आणण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात विशेष आयसोलेशन वॉर्ड येत्या डिसेंबरपासून तयार करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Swine flu prevented!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.