स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्ण आढळला!

By Admin | Updated: November 4, 2015 02:50 IST2015-11-04T02:50:03+5:302015-11-04T02:50:03+5:30

सर्वोपचार रुग्णालयात अतिदक्षता कक्षात उपचार सुरू.

Swine Flu positive patient found! | स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्ण आढळला!

स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्ण आढळला!

अकोला: स्वाइन फ्लूच्या आजाराने बाधित रुग्ण सातत्याने जिल्ह्यात सापडत असून, मंगळवारीसुद्धा एक रुग्ण स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
स्वाइन फ्लू आजाराने ग्रस्त रुग्ण रविवारपासून सर्वोपचार रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. रुग्णालयाने त्याच्या स्नॉबचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, हा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. रुग्णाचे नाव जयदेव श्रीकृष्ण राऊत(४५) असून, ते बोरगाव मंजूजवळील अन्वी मिर्झापूर येथील राहणारे आहेत. राऊत यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत.

Web Title: Swine Flu positive patient found!