स्वाईन संकट!
By Admin | Updated: February 6, 2015 02:45 IST2015-02-06T02:45:38+5:302015-02-06T02:45:38+5:30
आतापर्यंत एकूण २३ रुग्ण आढळले आहेत. हिवाळा लांबल्याने स्वाईनचे संकट मुंबईवर घोंगावत असून, या संकटाने मुंबई महापालिकेची झोप उडाली आहे.

स्वाईन संकट!
मुंबईकरांनो सावधान : २३ रुग्णांची नोंद, चौघांचा मृत्यू
मुंबई : गेल्या पंधरवड्यात राज्यात चार रुग्णांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण २३ रुग्ण आढळले आहेत. हिवाळा लांबल्याने स्वाईनचे संकट मुंबईवर घोंगावत असून, या संकटाने मुंबई महापालिकेची झोप उडाली आहे. महापालिकेने आता सर्व रुग्णालयांना चेतावनी देण्यास सुरुवात केली आहे.
चार वर्षांपूर्वी मुंबईत स्वाईनच्या भीतीने थैमान घातले होते. यंदा १९ जानेवारीपासून मुंबईत स्वाईन फ्लू पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे़ तेव्हापासून आतापर्यंत चार रुग्णांचा
मृत्यू झाला आहे. त्यातील कस्तुरबा रुग्णालयात दोघांचा तर जसलोक आणि होली स्पिरिट रुग्णालयात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. १२ रुग्ण
विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत़ याबाबत माहिती देण्यासाठी पालिका प्रशासनाने आज तातडीची पत्रकार परिषद बोलाविली होती़ हा आजार संसर्गजन्य असल्याने गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, दुखणे व आजार अंगावर काढू नये अशा
सूचना पालिकेने दिल्या आहेत. या आजारावर उपचार शक्य असल्याने घाबरून न जाता तत्काळ उपचार घ्यावेत, असे आवाहनही करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले़
स्वाईन फ्लूची लक्षणे
थंडी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसा खवखवणे अशी लक्षणे दिसून आल्यास घरगुती उपचार न घेता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा़
गर्दीचे ठिकाण टाळा!
स्वाईन संसर्गजन्य असल्याने गर्दीचे ठिकाण
टाळावे़ तोंडावर रुमाल अथवा मास्क लावावा.
मृत्युमुखी पडलेले मुंबईबाहेरचे
या आजाराचे बळी ठरलेले चारही रुग्ण पालघर, बदलापूर, वाशी आणि जळगाव असे मुंबई हद्दीबाहेरील आहेत़
डॉक्टर व शाळांना सूचना
खासगी शाळांना पालिकेने सतर्क केले असून, अशी लक्षणे दिसलेल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या, तत्काळ उपचार मिळेल असे पाहा, अशी सूचना केली आहे़ तसेच खासगी रुग्णालये व डॉक्टरांना उद्यापासून माहिती देण्यात येईल.
मुंबईत
दहा रुग्णांपैकी दोन रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात तर ४ रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल. चौघांना घरी सोडले.
मुंबईबाहेर
१३ पैकी २ रुग्ण कस्तुरबामध्ये तर ११ रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल आहेत.
च्पालिकेने केईएम, नायर, सायन ही प्रमुख तसेच १८ उपनगरीय रुग्णालये, कस्तुरबा रुग्णालयात या रुग्णांसाठी खाटा आरक्षित ठेवल्या आहेत़
च्प्रत्येक रुग्णालयात औषधांचा साठा आणि दोन व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहेत़ संशयित रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासण्यासाठी कस्तुरबा, राज्य सरकारचे हाफकीन व एका खासगी रुग्णालयात व्यवस्था केली आहे़
घाबरू नका,
फोन करा
नागरिकांनी घाबरून
न जाता अधिक
माहिती व शंका दूर करण्यासाठी पालिकेने सुरू केलेल्या विशेष हेल्पलाइनवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेल्पलाइन
२४११४०००
23 पैकी १० रुग्ण सांताक्रुझ, मुलुंड, मालाड, गोकूळधाम गोरेगाव, मुलुंड, वांद्रे, पेडर रोड, माहीम, भुलाभाई देसाई रोड असे मुंबईतील आहेत़ पाच रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत़ तीन जणांना डिस्चार्ज मिळाला असून, चार जणांवर बाह्य रुग्ण विभागाद्वारे उपचार सुरू आहेत़