गलिच्छ जागेत अशी तयार होते मिठाई

By Admin | Updated: October 31, 2016 03:31 IST2016-10-31T03:31:55+5:302016-10-31T03:31:55+5:30

नालासोपारा शहरात अत्यंत घाणेरड्या जागेत आणि निकृष्ठ दर्जाचे तेल आणि साहित्य वापरणारे मिठाईचे कारखाने फोफावले आहेत.

Sweet made in dirty space | गलिच्छ जागेत अशी तयार होते मिठाई

गलिच्छ जागेत अशी तयार होते मिठाई


वसई : नालासोपारा शहरात अत्यंत घाणेरड्या जागेत आणि निकृष्ठ दर्जाचे तेल आणि साहित्य वापरणारे मिठाईचे कारखाने फोफावले आहेत.
तुळींज पोलिसांनी सुमारे चार लाख रुपये किंमतीचा संशयास्पद बनावट मावा पकडून एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या हवाली केला होता. आता नालासोपाऱ्यातील अनेक मिठाई कारखाने प्रचंड घाणीचा परिसर असलेल्या चाळींमध्ये सुुरु आहेत. त्याठिकाण स्वच्छता नाही. चोहोबाजूंनी घाण आहे. तेल आणि इतर सामुग्री दुय्यम दर्जाची आहे. उघडेबंब कामगार स्वच्छतेची कोणतीच दक्षता घेत नाहीत, कच्चा मालही दुय्यम दर्जाचा अशी सारी स्थिती आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sweet made in dirty space