शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सणामध्ये टपाल विभाग आणणार भावा-बहिणीच्या नात्यात गोडवा, रक्षाबंधनासाठी विशेष नियोजन; राज्यभरात पथके तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 8:31 AM

Post Office : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील टपाल कार्यालयांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राख्यांच्या जलद हाताळणीसाठी ‘राखी बाय स्पीडपोस्ट’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

- सुहास शेलार

मुंबई : भावा-बहिणीच्या नात्यातील वीण घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. एकमेकांपासून दूर असलेली भावंडे यादिवशी आवर्जून भेटतात, पण गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनावर कोरोनाचे सावट असल्याने, त्यात खंड पडू न देण्यासाठी टपाल विभागाने पुढाकार घेतला आहे. दरवर्षी लाखो बहिणींनी त्यांच्या लाडक्या भाऊरायासाठी पाठविलेल्या राख्या वेळेत पोहोचविण्याचे काम पोस्टामार्फत केले जाते. कोरोनाच्या काळात माणसांच्या मुक्त संचारावर निर्बंध आल्याने ही संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्यभरात विशेष नियोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सर्कलच्या मेल विभागाचे सहायक संचालक मनोज साळवे यांनी दिली.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील टपाल कार्यालयांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राख्यांच्या जलद हाताळणीसाठी ‘राखी बाय स्पीडपोस्ट’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भावा-बहिणीच्या नात्यात आणखी गोडवा आणण्यासाठी रंगीबेरंगी पाकिटांसह, वॉटरप्रूफ आणि टेम्परप्रूफ कव्हर्स सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याशिवाय लोकजागृतीसाठी बॅनर, पोस्टर, स्टँडी जागोजागी लावण्यात आल्या आहेत. दूरचित्रवाणी, रेडिओच्या माध्यमातून जिंगल्सद्वारेही माहिती पोहोचविली जात आहे.

कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये राख्या खोळंबून राहू नयेत, यासाठी परिचलन व्यवस्था उभारण्यात आली आहेत. महत्त्वाच्या टपाल कार्यालयांत राख्यांसाठी विशेष खिडक्या राखून ठेवल्या आहेत, शिवाय राख्यांची पाकिटे अलग करण्याचा वेळ वाचविण्यासाठी वेगळ्या बॅग्ज देण्यात आल्या आहेत. राख्या वेळेत पोहोचविण्यासाठी कटऑफ तारीख ठरविण्यात आली आहे. त्यानुसार, राज्यासाठी १७ ऑगस्ट आणि परराज्यांत राख्या पाठविण्यासाठी १६ ऑगस्ट ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत राखी आमच्यापर्यंत पोहोचल्यास कोणत्याही अडथळ्यांविना रक्षाबंधनाच्या आधी ती संबंधितांपर्यंत पोहोचेल, अशी माहिती साळवे यांनी आली.

तत्काळ राख्या पोहोचविण्यासाठी यंत्रणागेल्या वर्षी महाराष्ट्र सर्कलकडे १ कोटी २१ लाख राख्या आल्या होत्या. त्यानुसार, यंदाचे नियोजन करण्यात आले आहे.तत्काळ राख्या पोहोचविण्यासाठी विशेष वितरण व्यवस्था, राखी मेलसारखी सुविधा प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यासाठी विशेष टीम तयार केली आहे.nकोरोनाच्या काळातील निर्बंधांमुळे काही सोसायट्यांच्या आवारात प्रवेश देण्यास मनाई करीत असल्यामुळे काही अडचणी जाणवत असल्याचेही साळवे यांनी नमूद केले.

गेल्या वर्षी किती राख्या पोहोचविल्या - १ कोटी २१ लाखराज्यातील पोस्ट कर्मचारी - ३८ हजारराज्यातील पोस्ट कार्यालये -  ३००रक्षाबंधन कधी- रविवार, २२ ऑगस्ट

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसRaksha Bandhanरक्षाबंधन