शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबई देशात तिसऱ्या स्थानी; नाशिक ११ व्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 13:32 IST

गेल्या वर्षी सातव्या स्थानी असलेल्या नवी मुंबईची तिसऱ्या क्रमांकावर उडी

नवी मुंबई/नाशिक: केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण योजनेत नवी मुंबईनं तिसरा क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी नवी मुंबई शहर स्वच्छ शहर सर्वेक्षणात सातव्या क्रमांकावर होतं. मात्र यंदा शहरानं तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर पहिल्या १० शहरांमध्ये येण्यासाठी विविध उपाययोजना राबवणाऱ्या नाशिक महापालिकेला ११ व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. नाशिक महापालिका राज्यात नवी मुंबईनंतर दुसऱ्या स्थानी आहे.केंद्र सरकारनं स्वच्छ शहर सर्वेक्षण योजना सुरू केल्यानंतर नाशिक महापालिकेनं सातत्यानं टॉप टेनमध्ये येण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यात यश आलं नव्हतं. गेली दोन वर्षे नाशिक ६४ आणि ६७ व्या क्रमांकावर होतं. त्यामुळे पालिका प्रशासनाचा भ्रमनिरास झाला होता. गेल्या वर्षी केंद्र शासनानं निकषात बदल केले आणि त्रैमासिक मूल्यमापन सुरू झालं. त्यात दोन वेळा नाशिकचा क्रमांक पहिल्या टॉप टेनमध्ये असल्यामुळे महापालिकेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, फेब्रुवारी महिन्यामध्ये केंद्र सरकारनं स्टार मानांकन जाहीर केलं. त्यात नाशिक महापालिकेला केवळ सिंगल स्टार मिळाल्यामुळे प्रशासनाचा भ्रमनिरास झाला होता. नाशिकच्या तुलनेत धुळे आणि जळगाव छोटी शहरे असतानादेखील त्यांना थ्री स्टार मानांकन मिळाल्यामुळे महापालिकेने आक्षेप घेतला होता. दरम्यान, आता केंद्र सरकारनं त्याचीही दखल या निकालात घेतली असून नाशिक महापालिकेला अकरावा क्रमांक जाहीर केला आहे. राज्यात नाशिक महापालिका दुसऱ्या स्थानावर असल्याची माहिती महापालिका आयुक्त  राधाकृष्ण गमे यांनी दिली. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका