स्वाभिमानी शेतकरी संघटना सदभाऊंना विचारणार जाब
By Admin | Updated: June 28, 2017 19:32 IST2017-06-28T18:54:44+5:302017-06-28T19:32:40+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील प्रमुख नेते असलेल्या राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद आता

स्वाभिमानी शेतकरी संघटना सदभाऊंना विचारणार जाब
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 28 - पक्षविरोधी भुमिका घेतल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांना जाब विचारणार आहे. यसाठी एका समितीची स्थापना केली असून, या समितीसमोर सदाभाउंना बाजू मांडण्यासाठी ४ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली असून त्यानंतर सदाभाऊ यांचा फैसला होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिले. स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधे राहणार की नाही याबाबत २५ जुलैनंतर निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बुधवारी पुण्यात झाली. या वेळी पत्रकारांना माहिती देताना शेट्टी बोलत होते. शेट्टी म्हणाले, ‘‘ सदाभाऊ खोत यांची भूमिका येथून पुढे स्वाभिमानीची अधिकृत मानली जाणार नाही. खासदार राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोफळे हेच स्वाभिमानीची अधिकृत भुमिका मांडतील.’’
सरकारनी जाहीर केलेली कर्जमाफीची आकडेवारी संशयास्पद हे आम्ही घेतलेल्या आढाव्यावरुन ध्यानात आले आहे असे सांगुन शेट्टी म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्यानुसार एवढ्या मोठ्या प्रमाणात जर शेतकºयांना लाभ होत असेल तर शेतकर्यांमधे एवढा असंतोष का आहे? एका बाजुला मुख्यमंत्री दावा करतात की राज्यावर प्रतिमाणसी सरासरी ५४ हजार रुपयांचे कर्ज आहे. परंतु ती आकडेवारी चुकीची असली पाहिजे. नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना जी मामुली मदत सरकारने देउ केलीय त्याच्याशी स्वाभिमानी असहमत आहे. कजार्चे पुनर्गठण करणाºया शेतकºयांना काय लाभ होणार याबाबत स्पष्टता नाही. केवळ मोठे आकडे देऊन शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रयत्न आहे.’’
शेट्टी म्हणाले, ‘‘ सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आम्ही अजुनही तयार आहोत. २५ जुलैपर्यंत सरकारनी चचेर्साठी वेळ द्यावी. मात्र त्यानंतर स्वाभिमानी थांबणार नाही. सरकारला वाकवुन स्वाभिमानी आपल्या मागण्या मान्य करून घेईल.स्वाभिमानी शेतकरी संघटनने सरकारला कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी २५ जुलैपर्यंत मुदत दिलीय. त्यानंतर संघटना आपला निर्णय घेण्यास सक्षम आहे. ’’
शेतक-यांचा सातबारा कोरा करणे आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागु करणे या दोन मुद्यावर आज देशभरातील संघटना एकत्र आल्या आहेत. शेतकºयांच्या मागण्यांसाठी मध्य प्रदेशातील मंदसौरपासुन सहा जुलैला शेतकरी मोचार्ची सुरुवात होईल. १८ जुलैला हा मोर्चा दिल्लीत पोहचेल. या आंदोलनात देशभरातील शेतकरी सहभागी होतील, असे शेट्टी यांनी सांगितले.