स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून पडली बाहेर, पुण्याच्या बैठकीत जाहीर केला निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 18:46 IST2017-08-30T18:45:11+5:302017-08-30T18:46:43+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारी परिषदेच्या बैठकीत शासनातून बाहेर पडत असल्याचा निर्णय बुधवारी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात जाहीर केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून पडली बाहेर, पुण्याच्या बैठकीत जाहीर केला निर्णय
पुणे, दि. 30 - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारी परिषदेच्या बैठकीत शासनातून बाहेर पडत असल्याचा निर्णय बुधवारी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात जाहीर केला.परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एकमताने हा निर्णय घेतला.
गेल्या काही महिन्यापासून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि शेट्टी यांच्यात मतभेद निर्माण झाले होते.स्वाभिमानी संघटनेने घेतलेल्या भूमिकेविरोधात सदाभाऊ खोत बोलत असल्याचे दिसून येत होते.त्या पार्श्वभूमीवर खोत यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली होती.समितेने त्यांना संघटनेतून काढून टाकावे असा अहवाल दिला होता.तसेच सत्तेतून बाहेर पडणार असल्याचे लवकरच जाहीर केले जाणार होते.त्यानुसार बुधवारी सत्तेतून बाहेर पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच येत्या 4 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबताचे लेखी पत्र देणार असल्याचे या प्रसंगी स्पष्ट करण्यात आले.
शेट्टी म्हणाले ,गेल्या चार वर्षापासून शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. महागाई वाढू नये त्यासाठी शेतीमालाच्या किमती वाढू दिल्या नाहीत. केंद्र शासनाने पाकिस्तानकडून कांदा आयात करून नाशिकच्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल.त्यामुळे प्रश्न पडतो शत्रू पाकिस्तान आहे की शेतकरी आहे. तसेच केंद्र व राज्य सरकार या दोन्ही सरकारशी संबंध नसल्याचे जाहीर केले.